सोमवार,३ नोव्हेंबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,सोमप्रदोष.
तिथी-त्रयोदशी २६|०६
रास-मीन
नक्षत्र-उत्तराभाद्रपदा
योग-हर्षण
करण-कौलव
दिनविशेष-शुभ दिवस
मेष - कामाची धावपळ आणि दगदग याचा वेगळाच जोर वाढलेला असेल. त्यामुळे कामाचा ताण सुद्धा येईल. मनोबल कमी राहील. वाहने सुद्धा जपून चालवण्याचा इशारा आहे.
वृषभ - मित्र-मैत्रिणींच्या सहवासामध्ये मन आनंदी राहील. फुलून जाईल. अनेक दिवस अडखळलेले रेंगाळलेले पत्रव्यवहार आज मार्गी लागणार आहेत.
मिथुन - सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढाकार घ्याल. उत्साह आणि उमेद वाढती राहील. रखडलेले कामे मार्गी लावून यशाची नवीन धुरा आज तुम्ही बाळगाल.
कर्क - महत्त्वाची कामे दुपारनंतरच करावी. काही जणांचा धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग असेल. मोठ्या प्रवासांच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.
सिंह - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. काही क्षेत्रांमध्ये यश तर काही ठिकाणी अपयश अशी परिस्थिती आज राहणार आहे.
कन्या - हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे.पण त्याचबरोबर चांगली गोष्ट एक अशी ही आपल्या जोडीदाराची कामाच्या ठिकाणी आणि संसारात सुद्धा अपेक्षित साथ लाभेल. त्यामुळे दिवस सुखाचा राहील.
तूळ - महत्त्वाची कामे दुपार पूर्वीच केलेली बरी राहतील. आर्थिक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचे धाडस आज करायला हरकत नाही. कामाच्या ठिकाणी आपल्या कामाचा बोलबाला होईल.
वृश्चिक - बौद्धिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायामध्ये केलेल्या कामाचे योग्य लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. धन योगाला दिवस चांगला आहे. कुलस्वामिनीची उपासना करावी.
धनु - राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. आपण ठरवलेल्या गोष्टीविषयी आत्मविश्वास वाढेल. मनोबल चांगले राहील.कुटुंबीयांच्या साथीने पुढे जाल.
मकर - एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य सुद्धा मिळणार आहे. जवळचे प्रवास होतील. दिवस काहीतरी वेगळेपण देऊन जाणार आहे.
कुंभ - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. जुनी येणी सुद्धा वसूल होतील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. काही गोष्टी कंजूसपणा, चिकटपणे कराल तर आज त्यात यश आहे.
मीन -आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभण्याचा आजचा दिवस आहे. मनासारख्या गोष्टी घडून येणार आहेत. त्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा कराल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.