Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अनेक प्रथा - परंपरा या फार पूर्वीपासून सुरू आहे. या जुन्या प्रथा- परंपरा त्याचपद्धतीने आजही पाळल्या जातात.
कोणत्याही शुभ कार्यक्रमापूर्वी नारळ फोडणे हे शुभ मानलं जाते.
शास्त्रानुसार, कोणत्याही शुभ कार्यापूर्वी पूजेत नारळ फोडावा.
लग्न विधी, ग्रृहप्रवेश, नवीन वाहन घेतल्यास आपण सर्वप्रथम नारळ फोडतो.
नारळ हा अत्यंत पवित्र आहे. नारळ पाणी घरातील नकारात्मकता नष्ट करते.
देवाच्या पूजेत नारळाला श्रीफळ म्हणतात.श्रीफळ हे देवांचे आवडते फळ आहे.
नारळाचा बाहेरील भाग अंहकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतला पांढरा आणि मऊ पृष्ठभाग शांततेचे प्रतीक मानलते.
नारळ फोडल्याने व्यक्तीमधील अहंकाराचा त्याग देवाच्या चरणी विसर्जित करणे असा होतो.
नारळाच्या पृष्ठभागावर तीन खुणा असतात या चिन्हांनाना शंकराचे तीन डोळे मानले जाते . हे यश, वैभव आणि समृद्धी आणते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.