Shatank Yog Saam Tv
राशिभविष्य

Shatank Yog: उद्यापासून या राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य; 30 वर्षांनंतर शनी बनवणार शतांक योग

ज्योतिषशास्त्रानुसार, ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा शनी शतांक योग निर्माण होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि तो संपत्ती, भाग्य आणि प्रगतीसाठी विशेष लाभदायी ठरतो.

Surabhi Jayashree Jagdish

कर्मफल दाता शनि सध्या मार्गी अवस्थेत मीन राशीत विराजमान आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनीला सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानण्यात येतं. शनि एका राशीत दीर्घकाळ राहतात आणि व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात किमान एकदा तरी शनीला साडेसातीचा सामना करावा लागतो.

शनि हे कर्म, न्याय, परिश्रम, अनुशासन आणि धैर्य यांचे कारक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. शनि मीन राशीत जून 2027 पर्यंत राहणार आहेत. या काळात इतर ग्रहांशी युती किंवा दृष्टि होऊन शुभ–अशुभ योग तयार होतील. लवकरच शनि वृश्चिक राशीत विराजमान असलेल्या शुक्राशी संयोग करून शतांक योग तयार करणार आहेत.

वैदिक ज्योतिषानुसार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 6:41 वाजता शनि–शुक्र एकमेकांपासून 100° अंतरावर असणार आहेत. ज्यामुळे शतांक योग तयार होणार आहेत.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र–शनि शतांक योग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या चौथ्या भावात शुक्र असल्यामुळे भौतिक सुखांची प्राप्ती होणार आहे. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमुळे लांब पल्ल्याच्या प्रवास करावे लागतील, पण त्यातून चांगला फायदा होणार आहे.

कन्या रास (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शतांक योग अनुकूल ठरणार आहे. अनेक कामांमध्ये यश मिळेल आणि जीवनात आनंदाचे क्षण येणार आहे. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे काम करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. व्यापारातही चांगला फायदा होईल.

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र–शनि शतांक योग विशेष ठरणार आहे. अनेक जुनी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही वैयक्तिक विकासावर अधिक लक्ष द्याल. धनलाभाचे अनेक योग तयार होत आहेत. करिअरच्या दृष्टीने परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू; राज ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

SCROLL FOR NEXT