Mahalaxmi Rajyog: 100 वर्षांनंतर तयार होतोय महालक्ष्मी राजयोग; या राशींचं भाग्य उजळून तिप्पट मिळणार पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार, १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. हा ग्रहयोग अत्यंत दुर्मिळ असून तो संपत्ती, भाग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो.
Mahalaxmi Rajyog
Mahalaxmi Rajyogsaam tv
Published On

ग्रहांचा सेनापती मंगळ आत्मविश्वास, साहस, ऊर्जा आणि पराक्रम यांचा कारक मानला जातो. साधारणपणे 45 दिवसांनी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करतो, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मंगळ धनु राशीत विराजमान असणार आहेत. 16 जानेवारीला ते मकर राशीत प्रवेश करतील. मकर राशीत प्रवेश केल्यावर मंगळाचा सूर्याशी संयोग होईल. याशिवाय 18 जानेवारीला चंद्र देखील याच राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत मंगळ–चंद्र युतीमुळे महालक्ष्मी राजयोग तयार होईल.

मंगळ आपल्या उच्च राशीत म्हणजे मकर राशीत असल्यामुळे या राजयोगाचं फळ अधिक मिळण्याची शक्यता आहे. या योगामुळे काही राशींच्या जातकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींसाठी चांगली सुरुवात असणार आहे ते पाहूयात.

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ–चंद्र युतीने तयार होणारा महालक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला विशेष फळांची प्राप्ती होणार आहे. सुख–समृद्धी मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुखांची प्राप्ती होणार आहे.

Mahalaxmi Rajyog
Lucky Zodiac Signs: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; शतांक योगाने नुसता पैसाच नाही तर करियरमध्येही मिळणार संधी

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या जातकांसाठी महालक्ष्मी राजयोग आनंद घेऊन येऊ शकणार आहे. मंगळ आपल्या उच्च राशीत असल्यामुळे या राशीवर सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे. या काळात देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. या काळात एखादी चांगली बातमी मिळू शकते.

Mahalaxmi Rajyog
Panchang today in Marathi: आजचा दिवस कसा आहे? पंचांग, शुभ काळ आणि या चार राशींसाठी विशेष लाभ

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या चतुर्थ भावात तयार होणार आहे. या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मान–सन्मान वाढण्याची शक्यता आहे. जीवनात आनंदाचे क्षण येतील.

Mahalaxmi Rajyog
Lucky zodiac signs: आज कोणत्या राशीवर चंद्राची कृपा? या चार राशींसाठी ठरणार लकी दिवस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com