horoscope  Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव होईल. तर काही लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

शुक्रवार,१९ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,प्रदोष,शिवरात्रि,मघा-त्रयोदशी श्राध्द.

तिथी-त्रयोदशी २३|३७

रास-कर्क ०७|०६ नं. सिंह

नक्षत्र- आश्लेषा

योग-सिद्ध

करण-गरज

दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य

मेष - जमीन खरेदीचे विक्रीचे व्यवहार जर आज करणार असाल तर दिवस अनेक चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. पैशाशी निगडित घटना घडतील. मानसिकता सकारात्मक ठेवून पुढे जावे. रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ - कलाकारांना विशेष लाभ मिळणारा आजचा दिवस आहे. जवळच्या प्रवासामधून फायदा होणार आहे. आपल्यामधील असणारे विशेष उर्मी आणि जिद्द याची जाणीव होईल. दुप्पट जोमाने कामे कराल.

मिथुन - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक सुखामध्ये विनाकारण अडचणी येण्याचा आजचा दिवस आहे. मात्र धन योगाला दिवस चांगला आहे. काळजी नसावी.

कर्क- प्रवासाचे योग आज आपल्या नशिबात आहेत. आपल्या चांगल्या स्वभावामुळे इतरांचे मन जिंकाल. आरोग्य चांगले राहील. नव्याने ओळखी होतील. दिवस सकारात्मक आहे.

सिंह - परदेश गमनाच्या काही गोष्टी असतील तर त्याच्या बैठका पार पडतील किंवा नियोजन होईल. मात्र दैनंदिन कामांमध्ये अडथळे येण्याचा संभव आहे. महत्त्वाची कामे दुपारनंतर केलेली बरी. सरकारी कामे आज नकोतच.

कन्या - आपल्या जवळच्या लोकांकडून आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. पुढील महत्त्वाच्या गोष्टीचे आयोजन नियोजनासाठी एकत्र भेटणे होईल. मैत्रीत नव्याने परिचय होतील. जुन्या मैत्री विशेष दृढ आणि वृद्धिंगत होण्याचा संभव आहे.

तुळ - करिअरला वेगळी कलाटणी मिळेल. समाजकारण, राजकारणामध्ये विशेष प्रगती आहे. आपली असणारी पत समोरचा ओळखून विशेष मान सन्मान पदरी पडणार आहेत. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - कलासक्त जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. अनेक ठिकाणी व्यवधान ठेवून कामे कराल. आपल्या महत्त्वाच्या क्षेत्रात प्रगती साधनाचा आजचा दिवस आहे. कामे सुरळीत पार पडतील. काळजी नसावी.

धनु - समाधानी आणि सात्विक असणारी आपली जरी रास असली तरी विभागाच्या व्यवहाराच्या दृष्टीने आज जपून पावले टाकावीत. नको त्या गोष्टीत अडकण्याची शक्यता आहे. जसे की लाचलुचपत, गैरव्यवहार धनाचा विशेष लोभ आज नकोच.

मकर - व्यवसायामध्ये अनेक दिवस रेंगाळत पडलेल्या गोष्टी आज सहज आणि सुकर होतील. कष्टाला पर्याय नाही हे पुन्हा नव्याने जाणवेल. इतरांच्याकडून आपल्याला कामे करून घ्यावी लागतील. कामाच्या बाबतीत अबोला टाळावा.

कुंभ - आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. नोकरीमध्ये गती आणि प्रगती दिसते आहे. मात्र लहान अडचणींवर मात करून पुढे जावे लागेल. तब्येत जपावी.

मीन - उपासनेला विशेष दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. आपल्यातील सुजनशिलता वाढीस लागेल. नव्याने काही शिकण्यासाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना विद्या अभ्यास वृद्धिंगत होताना दिसून येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT