ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, उशीखाली काही गोष्टी ठेवल्यास तुमच्या आयुष्यात पैशांची भरभराट होऊ शकते, जाणून घ्या.
जर तुम्ही उशीखाली मोरपंख ठेवला तर तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत.
घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी रात्री झोपताना उशाखाली लवंग ठेवा.
तमालपत्र हे घरात सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने उशीखाली तमालपत्र ठेवले तर त्याला जीवनातील सर्व सुख मिळते.
उशीखाली लसणाच्या काही पाकळ्या ठेवून झोपल्याने कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न वाढू शकते.
झोपण्यापूर्वी उशीजवळ एक फूल ठेवून झोपल्याने मानसिक शांती मिळते. तसेच यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.
ज्या लोकांना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्यांनी उशीखाली बडीशेप ठेवून झोपावे.