horoscope  Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : मनातील गोष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड कराल; 'या' राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

Friday Horoscope in Marathi : आज काही राशींचे लोक मनातील गोष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड करतील. तर काहींना घ्यावी लागेल विशेष काळजी

Anjali Potdar

आजचे पंचांग

शुक्रवार,१ ऑगस्ट २०२५,श्रावण शुक्लपक्ष, दुर्गाष्टमी

तिथी-अष्टमी (अहोरात्र)

रास- तुला

नक्षत्र-स्वाती

योग-शुभयोग

करण-विष्टीकरण

दिनविशेष-वृद्धीतिथी

मेष - रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. मानसिक स्वास्थ आणि समाधान यांनी भारलेला आजचा दिवस आहे. एकूणच मनातील सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी धडपड कराल आणि त्या प्राप्त होतील.

वृषभ- काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आपल्या जवळच्या लोकांकडून अपेक्षित सहाय्य मिळेल. हितशत्रू वर मात कराल. नवीन संशोधनात्मक कार्यामध्ये यश मिळेल.

मिथुन - बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मन आनंदी राहण्याचा आजचा दिवस आहे. ठरवाल ते करू अशा जिद्दीने पुढे जा. दत्त उपासना करावी.

कर्क - प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह, उमेद वाढवणारा आजचा दिवस आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. मातृसौख्य, वाहन सौख्याचा दृष्टीने दिवस उत्तम आहे.

कन्या- व्यवसायात वाढ होईल.कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधून पुढे जाल. जवळच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.शक्तीने नाही तर युक्तीने आज कामे कराल.

तूळ - आपल्या मतांविषयी आज आग्रह राहणार आहात. मनोबल आणि आत्मविश्वास वाढता राहील. दिवसाचे गमक साधणार आहे. मन आनंदी राहील.

वृश्चिक - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा आज करू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे केलेली जास्त बरे आहे किंवा नियोजित कामे न होता रखडण्याची दाट शक्यता आहे.

धनु - अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल. महत्त्वाच्या गाठीभेटी सुद्धा पार पडतील. लोकांच्यामध्ये जवळच्या व्यक्तींबरोबर ऊठबस असल्यामुळे समाधानाची लहर येईल.

मकर - आज आपले मनोबल चांगले राहणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. मान सन्मान प्रतिष्ठेमध्ये भर पडून दिवस आनंदाचा आहे.

कुंभ - तुमच्या कर्तुत्वाला नवनवीन संधी लाभतील. वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पहाल.

मीन - खर्चाचं प्रमाण अधिक राहील. आर्थिक निर्णय शक्यतो आज नकोतच. पुढे ढकलणे जास्त बरे राहील. काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : गौरी-गणपतीत उजळणार नशीब, ५ राशींच्या हाती येईल अचानक पैसा

PM Modi Meets Xi Jinping: 'ट्रम्प' कार्ड! टॅरिफ वॉर सुरू असतानाच PM मोदी-शी जिनपिंग यांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Chanakya Niti: आयुष्यात 'या' लोकांशी शत्रुत्व महागात पडेल, कारण...

Priya Marathe: लाडक्या मैत्रीणीला शेवटाचा निरोप; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर, हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIDEO

Padwal Curry Recipe : गावाकडे बनवतात तशी झणझणीत पडवळ करी, वाचा पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT