Sakshi Sunil Jadhav
आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनलाभ घेऊन आलेला आहे. कामांमध्ये अडचणी आल्या तरी आज दिवस सुरळीत पार पडेल.
एकमेका सहाय्य करू असा काही आजचा दिवस आहे. व्यवसायिक भागीदाराबरोबर कामाच्या नव्याने बैठका होतील.
काही गोष्टी सतर्क राहून आज कराव्या लागतील. नोकरीच्या बाबतीत आपल्या जवळचे लोक खोडा घालण्याचा प्रयत्न करतील.
गौरी पूजनाचा दिवस आहे. आज उमा महेश याची उपासना विशेष आपल्याला फलदायी ठरणार आहे. संततीकडून योग्य सहकार्य मिळेल.
घरी सणाच्या धामधुमीमध्ये आजचा दिवस जाईल. एक वेगळ्या प्रकारची शांतता मनाला लाभेल. जबाबदारीने कामे कराल.
जवळचे प्रवास घडतील. ठरवलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने होतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील. भावंड सौख्य उत्तम राहील.
घरी धार्मिक कार्यामध्ये हिरीरेने सहभाग घ्याल. मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आज लखलखीत दिवस जाणार आहे. धनसंपत्ती वृद्धी करणारा आजचा दिवस आहे.
आपल्यातला मी आज तुम्हाला सापडेल. इतरांना बरोबर घेऊन कामे कराल. सणासुदीच्या दिवसात आज विशेष सकारात्मकता राहील.
आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस आज सांभाळा. सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील. पण परिस्थितीवर मात करून पुढे जाल. काळजी नसावी.
जुन्या गुंतवणुकीचे लाभ आजच्या दिवशी मिळणार आहेत. जणूकी या शुभ दिनी लक्ष्मीच घरी आली. असा काहीच दिवस असेल.
आपले कार्यक्षेत्र वाढते राहणार आहे. वरिष्ठ आणि आपले सहकारी या दोघांच्या योग्य त्या सल्ल्यामुळे आणि मदतीने कामाचा महत्त्वाचा टप्पा पार कराल. दिवस चांगला आहे.
दत्त उपासना आज फायद्याची ठरेल. भगवंताने आजपासून पर्यंत दिलेल्या गोष्टींविषयी कृतकृत्य भाव असतील. भाग्यकारक घटना घडतील.