Sakshi Sunil Jadhav
हरणटोळ साप (Common Krait) हा साप प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि दक्षिण भारतात पाहायला मिळतोय.
हरणटोळ साप दिवसा कमी दिसतो पण रात्री शिकार शोधण्यासाठी तो बाहेर पडतो.
हरणटोळ साप सगळ्यात जास्त विषारी मानला जातो आणि भारतातील "बिग फोर" धोकादायक सापांमध्ये या सापाचा समावेश होतो.
झोपलेल्या अवस्थेत माणूस हलला की, डोक्याजवळ हालचाल झाल्याने हा साप सरळ चावा घेतो.
लोकांमध्ये गैरसमज आहे की तो फक्त डोक्यावरच चावतो. प्रत्यक्षात तो शरीराच्या कोणत्याही भागावर चावू शकतो, पण डोक्यावर हल्ले जास्त प्रमाणात नोंदवले जातात.
हरणटोळ साप घराच्या कोपऱ्यात, उंदरांच्या बिळात, ओलसर जागेत लपून बसतो, त्यामुळे गावात व शेतकरी भागात त्याचा धोका जास्त असतो.
चावा घेतल्यावर सुरुवातीला वेदना फारशा होत नाहीत पण हळूहळू अंग सुजते, श्वास घ्यायला त्रास होतो, लकवा येणे अशी लक्षणे दिसतात.
हरणटोळ साप चावल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक आहे. अँटी-स्नेक व्हेनम (ASV) इंजेक्शनच उपचार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.