PM Modi Meets Xi Jinping: 'ट्रम्प' कार्ड! टॅरिफ वॉर सुरू असतानाच PM मोदी-शी जिनपिंग यांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

India-China Leaders Discuss Border Issues: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भेट झाली. यावेळी सीमावाद, व्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य यावर सविस्तर चर्चा झाली.
PM Modi and President Xi Jinping during their bilateral meeting ahead of the SCO Summit in Tianjin.
PM Modi and President Xi Jinping during their bilateral meeting ahead of the SCO Summit in Tianjin.Saam Tv
Published On
Summary

तिआनजिनमध्ये मोदी-शी जिनपिंग यांची एक तासाची भेट पार पडली.

सीमावादामुळे संबंधांवर परिणाम होऊ नये यावर दोन्ही देश सहमत झाले.

द्विपक्षीय सहकार्य, धोरणात्मक संवाद आणि जागतिक शांततेसाठी एकत्र काम करण्यावर भर.

मोदींनी भारत-चीन हे भागीदार असल्याचं स्पष्ट करत आशियाला अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर टॅरिफचा भार टाकलेला असतानाच, दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक तास चर्चा झाली. ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे, असं शी जिनपिंग म्हणाले.

PM Modi and President Xi Jinping during their bilateral meeting ahead of the SCO Summit in Tianjin.
Israeli Strike: इस्रायलचं येमेनमध्ये एअर स्ट्राइक; हल्ल्यात हुथी पंतप्रधानासह अनेक मंत्र्यांचा मृत्यू

शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर गेले आहेत. मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. तिआनजीनमध्ये ही परिषद होत आहे. त्याआधीच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. चीननं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कझानमधील भेटीत झालेल्या चर्चेमुळं भारत-चीन संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. आता दोन्ही देशांतील सहकार्य निरंतरपणे वाढत आहे. ड्रॅगन आणि हत्ती एकत्रित येण्याची आवश्यकता आहे, असं शी जिनपिंग म्हणाले.

PM Modi and President Xi Jinping during their bilateral meeting ahead of the SCO Summit in Tianjin.
पोलीस इन्स्पेक्टरचा टोकाचा निर्णय; राहत्या खोलीत आयुष्य संपवलं; कुटुंबियांना वेगळाच संशय

तिआनजीनमधील अतिथीगृहात आज, रविवारी दुपारी शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर गेले आहेत. या बैठकीसंदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, कझानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या बैठकीनंतर भारत-चीन संबंधांत अधिकच सुधारणा झाली. द्विपक्षीय सहकार्य सातत्यानं वाढत आहेत, असं जिनपिंग म्हणाले. चीन आणि भारत दोन प्राचीन संस्कृती आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत. आपल्या लोकांचं कल्याण करणं, विकसनशील देशाची एकता मजबूत करणं आणि लोकांच्या प्रगतीमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणं ही या दोन देशांची जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

PM Modi and President Xi Jinping during their bilateral meeting ahead of the SCO Summit in Tianjin.
Mayurbhanj Shocking : संतापजनक! 80 किमीपर्यंत नेलं, तरुणीवर सामूहिक अत्याचार करून धावत्या कारमधून फेकलं

'संबंधांवर सीमावादाचा प्रभाव नको'

शी जिनपिंग यांनी चार मुद्द्यांवर अधिक भर दिला. दोन्ही देशांतील संबंधांकडं दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे, असं जिनपिंग म्हणाले. धोरणात्मक संवाद वाढवून परस्परांमधील विश्वास अधिक वाढवणं, सहकार्य आणि देवाण-घेवाण वाढवून दोन्ही देशांसाठी लाभदायक परिस्थिती निर्माण करणे, एकमेकांना सतावणारे प्रश्न समजून घेत शांततेने एकत्रित राहण्यास प्रोत्साहन आणि सीमावादाच्या मुद्द्यामुळं परस्परसंबंधांवर परिणाम होऊ न देणे, बहुपक्षीय सहकार्य अधिक बळकट करून आशिया आणि जगात शांतता आणि समृद्धीसाठी एकत्रित काम करणं या चार मुद्द्यांकडं जिनपिंग यांनी विशेष लक्ष वेधलं.

ड्रॅगन-हत्ती एकत्र राहणं अत्यंत गरजेचं

चिनी परराष्ट्र मंत्रालयानुसार, ड्रॅगन आणि हत्ती यांचं एकत्र येणं हाच दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे, असं जिनपिंग म्हणाले. कझानमधील भेटीनं भारत-चीन संबंधांची दिशा निश्चित झाली होती आणि आता संबंध सकारात्मक मार्गावर आले आहेत. सीमेवर सर्व काही आलबेल आहे. शांतता आहे. लवकरच हवाई वाहतूक पूर्ववत होऊन, विमानांची थेट उड्डाणे सुरू होतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत आणि चीन हे दोन देश प्रतिस्पर्धी नाहीत तर, भागीदार आहेत. दोन्ही देशांमध्ये मतभेदांपेक्षा सहमतीच कैक पटीने जास्त आहे. भारत आणि चीन एकत्रितपणे आशियाला अधिक मजबूत करतील आणि जागतिक व्यवस्थेत महत्वाचे योगदान देतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com