Israeli Strike Kills Houthi PM Ahmad Al-Rahwi
Israeli airstrike on Sana’a kills Houthi Prime Minister Ahmad Al-Rahwi and several ministers in Yemen.saamtv

Israeli Strike: इस्रायलचं येमेनमध्ये एअर स्ट्राइक; हल्ल्यात हुथी पंतप्रधानासह अनेक मंत्र्यांचा मृत्यू

Israeli Strike Kills Houthi PM Ahmad Al-Rahwi: इस्रायलने येमेनमधील साना येथे प्राणघातक हवाई हल्ला केलाय. यात हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी आणि त्यांच्या अनेक मंत्र्यांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यात १० बंडखोर ठार आणि ९० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
Published on

इस्रायलचा येमेनची राजधानी सना येथे हवाई हल्ला केला.

हल्ल्यात हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांच्यासह अनेक मंत्री ठार झाले.

१० बंडखोर व कमांडर ठार झाले तर ९० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

इस्रायलने येमेनवर मोठा हवाई हल्ला केलाय. इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ला केलाय. या हल्ल्यात हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला.त्यांच्यासह अनेक मंत्र्यांचा मृत्यू झालाय. हा हवाई हल्ला इस्रायलकडून करण्यात आलाय. यात साना येथील हुथी-नियंत्रित सरकारचे पंतप्रधानांचा मृत्यू झालाय.

Israeli Strike Kills Houthi PM Ahmad Al-Rahwi
Israel airstrikes: अ‍ॅकर बातम्या देत असतानाच बॉम्ब हल्ला; इस्रायली हल्ल्याचे दृश्य लाईव्ह कॅमेऱ्यात कैद| VIDEO

बंडखोर सशस्त्र गटाने शनिवारी हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यात पंतप्रधानांव्यतिरिक्त इतर अनेक मंत्री मारले गेल्याचे त्यांनी मान्य केलंय. इतर वृत्तांनुसार, १० हुथी बंडखोर आणि कमांडर मारले गेलेत. तर ९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Israeli Strike Kills Houthi PM Ahmad Al-Rahwi
Russia-Ukraine War : दहशत आणि क्रूरतेचा कळस! रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच रात्रीत डागल्या ६२९ मिसाइल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्याच्या वेळी राहवी यांच्यासोबत वर्कशॉपमध्ये हुथी संरक्षण मंत्री मोहम्मद अल-अती आणि लष्करी प्रमुख मोहम्मद अब्द अल-करीम अल-घमारी देखील उपस्थित होते. या दोघांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान हुथींनी अद्याप या दोघांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही.

येमेनच्या हुथी गटाने २८ ऑगस्ट रोजी इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून इस्रायली हवाई दलाने हुथींच्या ताब्यातील साना येथे बॉम्ब हल्ला केला. यादरम्यान, इस्रायलने हुथी लष्करी तळ आणि राष्ट्रपती भवनाला लक्ष्य करत हवाई हल्ले केलेत. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान हुथी बंडखोर हे पॅलेस्टाईनचे समर्थक आहेत.

गेल्या काही महिन्यांत त्यांनी इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागलेत आणि पॅलेस्टाईन लोकांशी एकता दाखवण्यासाठी हे हल्ले केल्याचा दावा त्यांनी केलेत. यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच हाणून पाडलेत.

लाल समुद्रात जहाजांना लक्ष्य

हा संघर्ष लाल समुद्रापर्यंतही पसरला असून तेथे हुथी बंडखोर इस्रायली व्यावसायिक जहाजांनावर हल्ला करतात. इस्रायलने येमेनची राजधानी साना आणि महत्त्वाचे बंदर शहर होदेइदासह हुथींच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात वारंवार हल्ले केलेत. मे महिन्यात झालेल्या अशाच एका इस्रायली हवाई हल्ल्यात सनाचे विमानतळ उद्ध्वस्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com