
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष निवळण्याऐवजी गेल्या चार वर्षांत तो अधिकच तीव्र झाला आहे. दोघांपैकी कुणीच हे वैर संपवण्यासाठी एक पाऊल पुढे येत नाही. आता तर रशियानं युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करण्यात आलं. युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाच्या इमारतीवर हा हल्ला करण्यात आला. रशियानं युक्रेनवर ६२९ मिसाइल आणि ड्रोन डागल्याची माहिती आहे. या हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून, ४८ जण जखमी झाले आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध अधिकच पेटलेले आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे कैक प्रयत्न केले. अलीकडेच ट्रम्प यांनी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती. त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र, दोन्हीही बैठका निष्फळ ठरल्या आणि युद्धविरामाबाबतचा कुठलाही निर्णय होऊ शकला नाही.
रशियानं युक्रेनची राजधानी कीवमध्ये हल्ला चढवला. युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाच्या इमारतीवर हा हल्ला करण्यात आला. रशियाच्या हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून, ४८ जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांनी एक्सवर पोस्ट केली. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील युरोपीय महासंघाची इमारत उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियानं आतापर्यंतचा सर्वात मोठा दुसरा हल्ला केला आहे. झेलेन्स्की यांनीही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रशियाच्या हल्ल्यात १४ मृत्युमुखी पडले असून, त्यात तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. रशियाच्या हल्ल्याचा युरोपीय महासंघानंच नव्हे तर जागतिक स्तरावर त्याचा निषेध नोंदवायला हवा, असंही झेलेन्स्की म्हणाले. युरोपीय महासंघाचे अध्यक्ष कोस्टा यांनीही या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, त्यांनी नुकसानग्रस्त इमारतीचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. रशियानं युक्रेनवर केलेल्या मिसाइल हल्ल्यानं भयभीत झालो आहे, असं ते म्हणाले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी या हल्ल्यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. युक्रेनवर एकाच रात्री ६२९ मिसाइल आणि ड्रोन डागले आहेत. दहशत आणि अत्यंत क्रूरता हीच रशियाची शांततेची विचारधारा आहे. लहान मुलांसह डझनभर नागरिक या हल्ल्यात मारले गेले आहेत. निवासी वस्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. फ्रान्स या क्रूर हल्ल्यांचा आणि मूर्खपणाचा कठोर शब्दांत निषेध करत आहे, असं मॅक्रॉन म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.