ध्वनीपेक्षा 5 पट वेगानं उड्डाण घेणार
24 हजार किमी प्रति तास वेगानं लक्षभेद करणार
हवेतच दिशा बदलण्याची क्षमता
हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देणार
एकीकडे भारत पाकिस्तान तणाव निर्माण झालाय.. त्यात भारताच्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांपुढं पाकिस्तान आणि चीनी मिसाईल आणि फायटर जेटनं नांग्या टाकल्या आहेत...पाहूयात डीआरडीओ कसं शस्त्रसज्ज आहे?
डीआरडीओनं विकसित केलेले शस्त्रं
ब्रह्मोस, अग्नी, पृथ्वी, नाग आणि आकाश क्षेपणास्त्रं
एटीएजीएस, धनुष, पिनाका या अत्याधुनिक तोफा
हापरसॉनिक मिसाईल, लेजर आणि स्मार अँटी एअरफिल्ड व्हेपन
अर्जून आणि माऊंटेड गन सिस्टीम हे टँक
अरुध्रा, हिमशक्ती आणि रोहिणी थ्री डी सर्विलन्स रडार
अर्जून टँकसाठीचा दारुगोळा
2025-26 साठी भारताचा संरक्षण बजेट- 6.81 लाख कोटी
गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण बजेटमध्ये 9.5 टक्क्यांनी वाढ
2024 मध्ये संरक्षण विभागावर 6.22 लाख कोटींचा खर्च
2014 मधील बजेटपेक्षा संरक्षण बजेटमध्ये तिप्पट वाढ
एकूण संरक्षण बजेटच्या 3.94 टक्के डीआरडीओच्या संशोधनावर खर्च
भारताकडून 21 हजार कोटींचं संरक्षण साहित्य निर्यात
भारतानं क्षेपणास्त्रे, तोफा, विमाने, ड्रोन्स आणि पाणबुडीविरोधी तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांत आत्मनिर्भर बनण्यासाठी भारत डायनॅमिक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, टाटा अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड, लॉर्सन अँड ट्युब्रो, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस आणि कारोल झिर्कोलाईट लिमिटेड या कंपन्यांसोबत करार केले आहेत.. त्यामुळे शस्त्रास्त्र निर्मितीत भारत 65 टक्के आत्मनिर्भर झालाय.
एकीकडे पाकिस्तान चायना आणि तुर्की बनावटीचे बोगस ड्रोन, मिसाईल आणि हवाई संरक्षण यंत्रणेसाठी भीक मागतोय.. मात्र भारत फक्त युद्धसाहित्य बनवतच नाही तर निर्यातही करतोय.. त्यामुळं बलाढ्य भारताकडे दुबळ्या पाकिस्तानने आणि कुरापतखोर चीनने पाहू नये.... अन्यथा तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता भारतामध्ये आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.