PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील, ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ

Narendra Modi Astrology Prediction: पीएम नरेंद्र मोदी यांच्या भविष्याबाबत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ज्योतिष संमेलनामध्ये एका ज्योतिषाने मोठं भाकीत केले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील.', असं त्यांनी सांगितले.
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील,  ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
PM Narendra ModiFile Photo
Published On

Summary -

  • पुण्यात झालेल्या ज्योतिष संमेलनात पीएम मोदींबाबत मोठं भाकित.

  • नरेंद्र मोदी अध्यात्माकडे वळून अज्ञातवासात जातील असे मत ज्योतिषांनी व्यक्त केले.

  • अजित पवार मुख्यमंत्री होतील, फडणवीस दिल्लीला जातील, असे ज्योतिष म्हणाले.

  • उद्धव ठाकरे राजकारणात टिकून राहतील, राज ठाकरे यांना अस्तित्व नाही - ज्योतिष

'पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील.' असं मोठं विधान ज्योतिष अभ्यासकाने केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. पुणे शहरामध्ये ४३ वे अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये देशभरातील ज्योतिष आणि ज्योतिष अभ्यासकांनी सहभाग घेतला आहे. हे संमेलन दोन दिवस चालणार असून यामध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये ज्योतिषांनी राज्यातील राजकीय नेत्यांपासून पीएम मोदींपर्यंत अनेकांच्या भविष्याबाबत भाकीत सांगितले.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील,  ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
PM Narendra Modi : यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, सिंधू पाणी करारावरून पीएम मोदींनी पाकिस्तानला खडसावले

या संमेलनामध्ये सहभागी झालेल्या एका ज्योतिष अभ्यासकाने सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रिका खूपच मजबूत होती की त्यांनी संपूर्ण भारत कॅप्चर केला आहे. पीएम मोदींची पत्रिका खूपच मजबूत आहे. पुढच्या काही वर्षांत मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि ते अज्ञातवासात जातील.' ज्योतिषाच्या या भाकितामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील,  ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
PM Modi Speech : पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, खुर्ची जाणारच; PM मोदींनी ठणकावलं

या संमेलनात आलेल्या आणखी काही ज्योतिषांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या भविष्याबाबबत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ज्योतिषांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस हे एक 'लंबी रेस का घोडा' असून ते दिल्लीकडे वाटचाल करतील. दिल्लीत ते मोठ्या पदावर काम करतील.'

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील,  ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
PM Modi : नेहरू-इंदिरांनाही मागे टाकत मोदींचा लाल किल्ल्यावरून नवा विक्रम; १०३ मिनिटांचा टप्पा पार

तर, 'अजित पवारांची पत्रिका संघर्षाची आहे. अजित पवार त्यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळेल.', तसंच, 'उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये. त्यांच्यासाठी कठीण काळ असला तरी, राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील.', असंही भाकित ज्योतिषांनी दिले. त्याचसोबत, राज ठाकरे यांना काहीही अस्तित्व नसल्याचे ज्योतिषाने सांगितले.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील,  ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com