Shreya Maskar
पडवळ करी बनवण्यासाठी पडवळ, चणा डाळ, बेसन, दही, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, गूळ, नारळाचा किस आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
पडवळ करी बनवण्यासाठी पडवळाची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंग टाकून फोडणी द्या.
फोडणीत हळद, पडवळचे तुकडे आणि भिजवलेली चणा डाळ घालून परतून घ्या.
एका बाऊलमध्ये बेसन, दही एकत्र टाकून फेटून घ्या.
शिजलेल्या पडवळच्या मिश्रणात बेसन-दही घालून छान ढवळून घ्या.
शेवटीत भाजीत मीठ, गूळ घालून एकजीव करा.
गरमागरम भात आणि पडवळ करीचा आस्वाद घ्या.