Trigrahi Yog In Kanya saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Trigrahi Yog In Kanya: नुकतंच एका राशीत तीन ग्रह आल्याने त्रिग्रही राजयोग तयार झाला आहे. यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठरलेल्या वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी एकाच राशीमध्ये दोन, तीन किंवा चार ग्रहांचा संयोग होतो. अनेकदा ग्रहांचं हे संयोजन काही लोकांसाठी सकारात्मक तर काही व्यक्तींसाठी नकारात्मक ठरू शकतं. असंच एका राशीत तीन ग्रह आल्याने त्रिग्रही राजयोग तयार झाला आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, कन्या राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला असून चंद्र, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार झाला आहे. ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला पैसे किंवा व्यवसायाशी संबंधित अशा बातम्या मिळू शकतात. तुम्हाला नवी नोकरी मिळू शकते किंवा लग्न होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदे मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.

सिंह रास

त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. स्वतःचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. नोकरदार लोकांचीही प्रगती होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

SCROLL FOR NEXT