Gajkesari Yog: दिवाळीपूर्वी गुरु-चंद्र बनवणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा होणार भाग्योदय

Gajkesari Yog: दिवाळीपूर्वी चंद्रासोबत गुरुचा संयोग होणार आहे. चंद्र आणि गुरुच्या संयोगाने गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशींचे भाग्य उजळवू शकणार आहे.
Gajkesari Yog
Gajkesari Yogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. सर्व ग्रहांमध्ये गुरु म्हणजेच बृहस्पतिला शुभ ग्रह मानलं जातं. गुरु ग्रह एका राशीमध्ये तब्बल एक वर्ष राहतो. त्यामुळे गुरु ग्रहाला एका राशीतून पुन्हा त्याच राशीमध्ये येण्यासाठी तब्बल १२ वर्ष लागतात. येत्या काळात गुरु ग्रहाचा चंद्राशी संयोग होणार आहे.

दिवाळीपूर्वी चंद्रासोबत गुरुचा संयोग होणार आहे. पंचांगानुसार, 17 ऑक्टोबरला चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार असून 19 ऑक्टोबरपर्यंत तो या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत या काळात चंद्राचा गुरूशी संयोग होणार आहे. चंद्र आणि गुरुच्या संयोगाने गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशींचे भाग्य उजळवू शकणार आहे. चंद्र आणि गुरूच्या संयोगाने तयार झालेला गजकेसरी योगामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे नवे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Gajkesari Yog
Shani Nakshatra Gochar: शनी देव राहुच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 3 ऑक्टोबरपासून 'या' राशी होणार मालामाल

मेष रास

या राशीच्या दुसऱ्या घरात म्हणजेच संपत्तीत गजकेसरी योग तयार होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. कर्जमुक्तीसोबतच पैशांची बचत करू शकता. या काळात अनावश्यक खर्चापासून सुटका मिळवू शकता. अध्यात्माकडे तुमची आवड वाढू शकणार आहे. कुटुंबामध्ये तुमची अधिक मदत होणार आहे.

तूळ रास

गजकेसरी राजयोग तयार झाल्याने या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कामाच्या संदर्भात तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. भविष्यात तुम्हाला पैशांबाबत बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.

कन्या रास

या राशीमध्ये चंद्र नवव्या भावात गजकेसरी योग तयार होणार आहे. गजकेसरी राजयोगाची निर्मितीने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. नवीन काम आणि व्यवसायासाठी हा काळ खूप शुभ आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. अविवाहित लोकांचं लग्न होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे.

Gajkesari Yog
Samsaptak Rajyog: गुरु-शुक्राच्या युतीने तयार होणार समसप्तक राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com