Mahalakshmi Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Ruchak Yog: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार रूचक राजयोग; या राशींचं नशीब रातोरात पलटणार

Ruchak Yog In Kundli: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह जेव्हा स्वतःच्या उच्च राशीत किंवा स्वतःच्या राशीत बलवान स्थितीत येतो तेव्हा ‘रुचक राजयोग’ तयार होतो. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात पंचमहापुरुष राजयोगांचे वर्णन दिसून येतं. हे राजयोग आहेत रूचक, भद्र, मालव्य, शश आणि हंस राजयोग. रूचक राजयोग 2026 च्या सुरुवातीला तयार होणार आहे. मंगळ ग्रह जानेवारी महिन्यात आपल्या उच्च राशी मकरमध्ये प्रवेश करणार आहे, ज्यामुळे रूचक राजयोगाची निर्मिती होईल.

यावेळी काही राशींना या योगाचा फायदा होणार आहे. तसंच या राशींच्या धन-संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

मकर राशि (Makar Zodiac)

रूचक राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होईल आणि काही काळासाठी आर्थिक तुटवडा दूर होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीसाठी मंगळ ग्रहाचा गोचर लाभदायक ठरू शकतं. मंगळाची स्थिती अत्यंत मजबूत होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. नवे गुंतवणुकीचे निर्णय लाभदायक ठरतील.

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचा गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. बेरोजगारांना नवी नोकरी मिळू शकणार आहे. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. एखादी मोठी डील झाल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुलतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : युद्ध भडकलंय तरी पेट्रोल,डिझेल भडकणार नाही? कसे?

Clove Benefits: उन्हाळ्यात लवंग का खातात?

Genelia Deshmukh: 'पिंक स्वॅग...'; जिनिलीया देशमुखचा ग्लॅमरस पिंक बार्बी लूक व्हायरल

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

Dombivli to Thane Bus: डोंबिवलीवरुन ठाण्याला फक्त २० रुपयात; केडीएमटीने सुरु केली नवी बससेवा

SCROLL FOR NEXT