Veen Doghatli Hi Tutena  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghatli Hi Tutena : अखेर तो क्षण आला; समर-स्वानंदी समोरासमोर, पाहा VIDEO

Veen Doghatli Hi Tutena Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात समर-स्वानंदीची भेट झाली आहे.

Shreya Maskar

'वीण दोघांतली ही तुटेना ' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

मालिकेत समर-स्वानंदीची भेट झाली आहे.

पहिल्याच भेटीत समर-स्वानंदीचे मोठे भांडण झाले आहे.

सध्या नवीन मराठी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना ' (Veen Doghatli Hi Tutena) प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र मालिका सुरी झाल्यापासून प्रेक्षक समर आणि स्वानंदीच्या भेटीची वाट पाहत आहे. अखेर तो क्षण आला आहे, जेव्हा समर आणि स्वानंदी एकमेकांच्या समोरासमोर येतात. याचा खास प्रोमो झी मराठी वाहिनीने शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्वानंदी समरच्या ऑफिसमध्ये येते आणि विचारते की, "तुम्ही समर राजवाडे आहात का?" त्यानंतर ऑफिस रुममध्ये दोघे एकमेकांच्या समोर येतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की, "माझे नाव स्वानंदी सरपोतदार आहे." तेव्हा समर म्हणतो, "हिंमत कशी झाली तुझी माझ्या ऑफिसमध्ये येण्याची?"

तेव्हा स्वानंदी उत्तर देत म्हणते, "माझी इच्छा अजिबात नाही आहे येथे येण्याची,पण मला दुसऱ्यांबद्दल काही तरी वाटते... तुमच्या सारखी कोरडी नाही आहे मी..." त्यावर समर म्हणतो, "मी सर्व कायद्याने करतो. अस घुसत नाही. ते तुम्ही करता आणि तुमची आई..." तेव्हा परत स्वानंदी बोलते, "खूप उपकार मला तुमच्या आयुष्यातील दीड मिनिटे दिली त्यासाठी..." त्यावर समर चिडून बोलतो की, "चांगली चार मिनिटे तेरा सेकंद वाया घालवली तुम्ही" शेवटी स्वानंदी रागात समरला "घड्याळ आहे हा..." असे म्हणते.

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या नवीन प्रोमोला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओला खूप खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "अखेर समर आणि स्वानंदीची पहिली भेट होणार!" चाहते या भेटीसाठी खूप उत्सुक आहेत. येणाऱ्या 26 ऑगस्टच्या भागात समर आणि स्वानंदीची भेट होणार आहे.'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT