Highest Grossing Movies : 2025मध्ये 'छावा' चा बोलबाला, सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते?

Highest Grossing Movies In India 2025 : 2025मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांनी बंपर कमाई केली. भारतातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप ५ चित्रपट कोणते, जाणून घेऊयात.
Highest Grossing Movies In India 2025
Highest Grossing MoviesSAAM TV
Published On
Summary

2025मध्ये विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'कुली' आणि 'वॉर 2' एकमेकांना टक्कर देत आहेत.

2025 मधील सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट जाणून घेऊयात.

2025च्या सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. 2025च्या सुरुवातीला 'छावा' ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची क्रेझ आताही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. चित्रपटातील गाणी तुफान गाजत आहे. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते, जाणून घेऊयात.

छावा

'छावा' (Chhaava ) चित्रपट 2025चा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. 'छावा'ने जगभरात 800 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला. चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकले आहेत. 'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईची भूमिकेत दिसली आहे. चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे.

सैयारा

अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) चा 'सैयारा' (Saiyaara) 18 जुलैला रिलीज झाला आहे. 'सैयारा'चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाने जगभरात 542.40 कोटी रुपये कमावले आहेत.

कुली

'कुली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 245.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर जगभरात 'कुली'ने 400 कोटींच्यावर कमाई केली आहे. 'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज झाला.'कुली'मध्ये रजनीकांत यांच्यासोबत आमिर खान, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हसन आणि सत्यराज असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. 'कुली' तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

वॉर 2

'वॉर 2' मध्ये ज्युनिअर एनटीआर , हृतिक रोशनसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील झळकली आहे. 'वॉर 2'ला सुपरॲक्शन चित्रपट आहे. वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर'चा सीक्वल आहे. 'वॉर 2'ने जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'वॉर 2' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज झाला.

हाऊसफुल 5

' हाऊसफुल 5' चित्रपटाने जगभरात 270 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'हाऊसफुल 5'हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. या चित्रपटात फुल कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे.'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.

Highest Grossing Movies In India 2025
War 2 VS Coolie Collection : 'कुली'ची 300 कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू, 'वॉर 2'नं किती कमावले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com