Ahaan Panday-Aneet Padda: सैयारा नंतर अहान पांडे आणि अनित पड्डाच्या डेटिंगला सुरुवात? इंटरनेटवर रंगली चर्चा

Ahaan Panday-Aneet Padda Dating: अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनित पड्डा यांच्या 'सैयारा' चित्रपटानंतर डेटिंगच्या चर्चा रंगल्या अलिकडेच ते मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते.
Ahaan Panday-Aneet Padda
Ahaan Panday-Aneet PaddaSaam Tv
Published On

Ahaan Panday-Aneet Padda: अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनित पड्डा यांनी मोहित सुरी यांच्या 'सैय्यारा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि हे कलाकार एका रात्रीच स्टार बनले. तेव्हापासून ते अनेकदा एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या डेटिंगच्या अफवाही पसरल्या. आता अलिकडेच ते मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते.

दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोज दिली

ही कॅज्यूल भेट होती की दोघेही पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्ट किंवा शूटसाठी एकत्र येत आहेत हा अंदाज चाहते लावत आहेत. यावेळी अहान पांडेने पांढरा टी-शर्ट, ग्रे झिप-अप जॅकेट, हलकी-वॉश जीन्स आणि काळ्या स्नीकर्स घातले होते. तर, अनित अतिशय साध्या आणि कॅज्युअल पण क्यूट लूकमध्ये होती. यावेळी दोघेही रेस्टॉरंटमधून वेगळे बाहेर पडले, ज्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत की ते कॅज्यूल भेटले होते.

Ahaan Panday-Aneet Padda
Box Office Collection: 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या 'सैयारा' आणि 'सन ऑफ सरदार २'ची कमाई

अहान आणि अनित पड्डा डेटिंग करत आहेत का?

अहान आणि अनित पुन्हा एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवांना अधिक हवा मिळाली आहे. यापूर्वी, त्यांना मुंबईत खरेदी करताना पाहिले गेले होते जिथे अहानची आई डीन पांडे देखील त्यांच्यासोबत होती. या व्हिडिओमध्ये अहान अनितला मदत करत होता, परंतु कॅमेरा पाहताच तो लगेच मागे गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला आणि यांच्या डेटिंगच्या अफवांना सुरुवात झाली.

Ahaan Panday-Aneet Padda
Box Office Collection: 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या 'सैयारा' आणि 'सन ऑफ सरदार २'ची कमाई

वाढती लोकप्रियता

दरम्यान, अनित आणि अहान व्यावसायिकदृष्ट्याही पुढे जात आहेत. चित्रपटाच्या रिलीजनंतर, आयएमडीबीच्या सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत जगभरातील टॉप १०० सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत हे दोघे ६४ व्या आणि ७५ व्या क्रमांकावर आहेत. या दोघांसाठी ही एक मोठी कामगिरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com