'छावा' चित्रपटाची जगभरात तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे.
'छावा' च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे.
'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.
लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' (Chhaava ) चित्रपटाने अवघ्या जगाला वेड लावले. आजही या चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. थिएटर आणि ओटीटी गाजवल्यावर चित्रपट आता टिव्हीवर पाहता येणार आहे. याचे अपडेट नुकतेच शेअर करण्यात आले आहे. 'छावा' च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे.
'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला. 'छावा' हा 2025 चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकले आहेत.
विकी कौशलच्या (Vicky Kaushal ) 'छावा' चित्रपटाचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहता येणार आहे. याची खास पोस्ट रिलीज करण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 17 ऑगस्टला रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर पाहता येणार आहे. तसेच चित्रपट हिंदीसोबतच मराठी भाषेतही पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपटाने जगभरात 800 कोटींच्यावर कमाई केली आहे.
'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईची भूमिकेत दिसली आहे. चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले आहे. यांच्यासोबतच चित्रपटात दिव्या दत्ता, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर पाहायला मिळत आहेत. 'छावा' चित्रपटातील गाणी आणि डायलॉग खूप प्रसिद्ध झाले आहेत. 'छावा'मुळे विकी कौशलला खूप प्रसिद्धी मिळाली. 'छावा' पहिल्यांदा टिव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
'छावा' चित्रपट कधी रिलीज झाला?
14 फेब्रुवारी 2025
'छावा' चित्रपट टिव्हीवर कधी पाहता येणार?
17 ऑगस्ट 2025
'छावा' चित्रपटाच मुख्य भूमिकेत कोण?
विकी कौशल - छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
लक्ष्मण उतेकर
'छावा'ची कमाई किती?
जगभरात 800 कोटींच्यावर