Chhaava : "हीच कमाई...", चिमुकल्याने रिक्रिएट केला 'छावा'चा क्लायमॅक्स, व्हिडीओ पाहून डोळ्यातील पाणी थांबणार नाही

Chhaava Viral Video : विकी कौशलचा 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एका मुलाने 'छावा'चा क्लायमॅक्स रिक्रिएट केला आहे.
Chhaava Viral Video
Chhaava SAAM TV
Published On

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava ) चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चित्रपटातील विकी कौशलच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. चित्रपटातील डायलॉग खूप प्रसिद्ध झाले आहेत. 'छावा' चित्रपट लहानांपासून मोठ्यापर्यंत भावुक करणारा आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हा व्हिडीओ एका चिमुकल्याचा आहे. त्याने 'छावा' चित्रपटातील एक खास सीन स्वतः केला आहे. या चिमुकल्या मुलाने 'छावा'मधील क्लायमॅक्स सीन (Climax Scene Recreate) रिएक्रिएट केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या छोटो मुलांचे हात बांधले आहेत. त्याने पांढऱ्या रंगाची बनियन घातली आहेत, ज्यावरलाल डाग दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तो लहान मुलगा 'छावा'च्या क्लायमॅक्स सीनमधील कवी कलश आणि छ. संभाजी महाराजांमधील संवाद बोलताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सर्वजण त्या मुलाचे कौतुक करत आहे. या व्हिडीओवर लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, "छावा सिनेमाची सगळ्यात मोठी कमाई ही आहे... बाल मनावर इतिहासाची छाप पडावी... इतिहास या लेकरांना उमगतंय. धन्य झालो आपण"

'छावा' चित्रपटात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत. मराठी अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका केली आहे. साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईची भूमिकेत आहे. तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. 'छावा' चित्रपट आता लवकरच ओटीटीवर देखील पाहायला मिळणार आहे. 'छावा' विकी कौशलच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Chhaava Viral Video
"जबरदस्ती रंग लावण्याचा प्रयत्न अन्...", होळी पार्टीत नशेत धुंद अभिनेत्याने २९ वर्षीय अभिनेत्रीची काढली छेड, नेमकं घडलं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com