Chhaava Movie Review : सासूबाईंनी केलं जावयाचं कौतुक! 'छावा' मधील सुव्रत जोशीच्या नकारात्मक भूमिकेबद्दल शुभांगी गोखले म्हणाल्या...

Shubhangi Gokhale: 'छावा' चित्रपटातील कान्होंजींची भुमिका साकारणारा अभिनेता सुव्रत जोशी बद्दल त्यांच्या सासुबाईंनी त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे. त्याचसोबत आणखी एक मराठी कलाकार म्हणजे सारंग साठ्ये याच्या भुमिकेबद्दलही त्यांनी कौतुक केले आहे.
Shubhangi Gokhale
Chhaava Movie Review instagram
Published On

महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे ती 'छावा' चित्रपटाची. बॉक्स ऑफीसवर सलग तीन ते चार दिवस असणारा हा चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच छावा या चित्रपटामध्ये अनेक कलाकार पाहायला मिळाले. त्यात मराठी कलाकारांचाही समावेश होता. त्यातीलच एक 'दिल दोस्ती दुनियादारी' या मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता सुव्रत जोशीने यात काम केले आहे. त्याने कान्होजींची भुमिका या चित्रपटात साकारली. हे पात्र निगेटिव्ह स्वरुपाचे होते. यावरचं त्याच्या सासुबाई 'शुभांगी गोखले' यांनी भाष्य केले. त्यात त्या नेमकं काय म्हणाल्या? हे आपण पुढील माहिती द्वारे जाणून घेणार आहोत.

Shubhangi Gokhale
Bhagyashree Injured : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री गंभीर जखमी; कपाळावर पडले १३ टाके, नेमकं घडलं काय?

शुंभांगी गोखले काय म्हणाल्या?

'छावा' चित्रपटात गणोजी आणि कान्होंजी यांची भुमिका मराठीतील दोन सुप्रसिद्ध कलाकारांनी साकारली. त्यातील गणोजींची भुमिका सारंग साठ्ये तर कान्होंजींची भुमिका सुव्रत जोशीने केली. यांच्या भुमिकेवर मराठीतील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले महत्वाची प्रतिक्रीया दिली.

ती म्हणजे, 'खूप अभिमान वाटतो. की, 'मराठी अभिनेता सुव्रत जोशी यांनी इतक्या मोठ्या आणि प्रसिद्ध चित्रपटात काम केलं आहे. त्याबद्दल मला अभिमान वाटतो. सुव्रत एक उत्कृष्ठ नट आहेच. तर आता तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यात त्याचा रोल हा निगेटिव्ह आहे. लोकांना त्याला बघून चीड येते. पण यामुळेच सिद्ध होते की, तो प्रेक्षकांचं मन जिंकतोय. हेच सारंग आणि सुव्रतचं सगळ्यात मोठं यश आहे.'

'छावा' चित्रपटातील कलाकारांनी उत्तम भुमिका साकारलेल्या आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भुमिका विकी कौशल आणि रश्मिका मंदाना हीने येसुबाईंची भुमिका साकारली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. यांचे संपुर्ण चित्रकरण आणि शेवट ह्दयपिळवटून टाकणारा आहे. हा चित्रपट पाहताना प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात अश्रू दिसले. बराच इतिहास कळला. त्यामुळे 'छावा' लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. असंही शुभांगी यांनी पुढे सांगितलं.

Shubhangi Gokhale
Pinga Ga Pori Pinga : पिंगा गर्ल्सचा स्वॅग लय भारी, पाहा कसा जपणार प्रेरणाचा स्वाभिमान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com