Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती संभाजी महाराज एक उत्तम योद्धा होतेच, त्याचप्रमाणे ते उत्तम साहित्यिक देखील होते.
छत्रपती संभाजी महाराज यांनी नायिकाभेद, नखशीख तसंच सातसतक असे ग्रंथ लिहिले.
याशिवाय वयाच्या १७व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथही लिहिला.
हा ग्रंथ संस्कृतमध्ये असून यामध्ये तीन अध्याय आहेत. आणि ६५ प्रकरणं आणि ८८६ श्लोक आहेत.
पण तुम्हाला माहितीये का? हा बुधभूषण ग्रंथ आता नेमका कुठे आहे?
बुधभूषण हा ग्रंथ सर्वप्रथम डॉ. भाऊ दाजी लाड यांना सापडला होता. ते एक त्वचारोग तज्ज्ञ होते.
महाराजांचा बुधभूषण ग्रंथ मुंबईतील रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये ठेवण्यात आला आहे. त्याची प्रत याठिकाणी आहे.