Chhaava OTT Release : तारीख ठरली! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' ओटीटीवर येणार

Chhaava OTT Release Date : विकी कौशलचा 'छावा' चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचे ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.
Chhaava
Chhaava OTT ReleaseSAAM TV
Published On

'छावा' चित्रपटाने खूप कमी वेळात उंच शिखर गाठले आहे. 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. 'छावा' चित्रपटातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. हा शानदार चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' (Chhaava ) हा 2025 चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. 'छावा'चे तगडे प्रमोशन करण्यात आले होते. 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटर आजही हाऊसफुल पाहायला मिळतात.

आता चाहते 'छावा'च्या ओटीटी (OTT Release) रिलीजची वाट पाहत आहे. 'छावा'च्या ओटीटी रिलीजची अपडेट समोर आली आहे. आता 'छावा' लवकरच तुमच्या घरात येणार आहे. 'छावा'मधील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला आहे. तसेच चित्रपटातील गाण्यांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'छावा'चे डायलॉग अंगावर काटा घेऊन येतात.

'छावा' ओटीटी रिलीज

'छावा' चित्रपट आता लवकरच घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार पाहता येणार आहे. 'छावा' सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 ला रिलीज झाला. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट पुढच्या महिन्यात 11 एप्रिल 2025 ला ओटीटीवर रिलीज होणार आहे. विकी कौशलचा 'छावा' नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. 'छावा'ने थिएटरमध्ये बंपर कमाई केली आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

'छावा' कलेक्शन

'छावा' चित्रपटाने मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत जगभरात तब्बल 700 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर बॉक्स ऑफिसवर लवकरच 'छावा' 600 कोटींचा रेकॉर्ड मोडणार आहे. 'छावा'साठी प्रेक्षकांची क्रेझ आताहा वाढताना दिसत आहे.

'छावा' स्टारकास्ट

'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईची भूमिकेत आहे. तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले आहे. मराठी अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका केली आहे.

Chhaava
Chamak - The Conclusion : सूड घेण्‍याची वेळ आली..., 'चमक: द कन्‍क्‍लुजन'चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com