Chamak - The Conclusion : सूड घेण्‍याची वेळ आली..., 'चमक: द कन्‍क्‍लुजन'चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Chamak - The Conclusion Trailer Launch : 'चमक: द कन्‍क्‍लुजन'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'चमक: द कन्‍क्‍लुजन' कधी रिलीज होणार, तारीख जाणून घेऊयात.
Chamak - The Conclusion Trailer Launch
Chamak - The Conclusion SAAM TV
Published On

मोहित मलिक आणि ईशा तलवारची वेब सीरिज पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 'चमक: द कन्‍क्‍लुजन' वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज तुम्हाला 'सोनी लिव्‍ह' वर पाहता येणार आहे. 'चमक: द कन्‍क्‍लुजन' (Chamak - The Conclusion) 4 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज संगीत, रहस्‍य व सूडाच्‍या रोमांचक मनोरंजनाची खात्री देते. रोहित जुगराज यांच्‍याद्वारे निर्मित आणि दिग्‍दर्शन करण्यात आले आहे.

'चमक: द कन्‍क्‍लुजन' पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्‍सुकता निर्माण झाली आहे. 'चमक: द कन्‍क्‍लुजन' मध्ये कालाला त्‍याच्‍या वडिलांच्‍या मृत्यू मागील सत्‍य समजते. ज्‍यानंतर तो सूड घेण्‍याच्‍या प्रवासाला निघतो. प्रताप देओल आणि गुरू देओल यांचा सामना करत काला त्‍याचा कुटुंबाचा सन्मान पुन्‍हा मिळवण्‍याचा निर्धार करतो. तणाव वाढत असताना तो त्‍याच्‍या पालकांचा सूड घेण्‍यामध्‍ये आणि त्‍याच्‍या वडिलांचा वारसा पुन्‍हा मिळवण्‍यामध्‍ये यशस्‍वी होईल का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

निर्माता आणि दिग्‍दर्शक रोहित जुगराज म्‍हणाले, संगीत हा सीरिज 'चमक: द कन्‍क्‍लूजन'चा महत्त्वपूर्ण पैलू राहिला आहे. सीझन २ मध्‍ये ही सीरिज कालाच्‍या सूडाच्‍या प्रवासाची महत्त्वपूर्ण भाग बनली आहे. प्रत्‍येक बीट, गीत आणि ताल त्‍याची वेदना, सूड आणि निर्धार भावना सांगत आहे. हा सीझन फक्‍त समाधानापुरता मर्यादित नसून संगीत व शक्‍तीच्‍या माध्‍यमातून न्‍यायाचा शोध घेतो."

रोहित जुगराजद्वारे निर्मित आणि दिग्‍दर्शित या सीरिजचे निर्माते गीतांजली मेहेल्‍वा चौहान, रोहित जुगराज व सुमीत दुबे आहेत. सिरीज 'चमक: द कन्‍क्‍लुजन' मध्‍ये तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात परमवीर सिंग चीमा, मनोज पाहवा, गिप्पी गरेवाल यांची खास उपस्थिती आहे. तर मोहित मलिक, ईशा तलवार, मुकेश छाब्रा, प्रिन्स कंवलजीत सिंग, सुविंदर पाल आणि आकासा सिंग हे कलाकार पाहायला मिळत आहे.

Chamak - The Conclusion Trailer Launch
Riteish Deshmukh : "...घरात मी जिनिलीयाचा गुलाम", रितेश देशमुख असं का म्हणाला? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com