
सध्याच्या महिला सुंजर दिसण्यासाठी चेहऱ्यावर अनेक महागड्या प्रोटक्टचा वापर करतात. पण त्याचा वापर करून त्यांना भविष्यात जास्त समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आत्ता मुद्दा हा आहे की, पुर्वी इतकी महागडी उपकरणं नव्हती. तेव्हा महिला सुंदर दिसण्यासाठी नैसर्गिक वनस्पतींचा वापर करायच्या. त्यामध्ये काळ्या कोळशाचा वापर आयलायनरसाठी तर ओठांना लिपस्टीक ऐवजी बेरींचा वापर केला जायचा. असेच उपाय आणि नॅचरल पद्धती आपण जाणून घेणार आहोत.
पुर्वी लग्नसमारंभात हाताला मेंदी लावण्यासाठी घरीच साखरेची मेंदी तयार केली जायची. काडीपेटीने डिझाईन करून हातावर काढली जायची. तर महिला सुंदर दिसण्यासाठी केसांना लाल रंग लावत . पुर्वी महिलांमध्ये मोठी टिकली लावण्याचाही ट्रेंड असायचा. तसेच डोळ्यांजवळ, भुवयांजवळ ठिपके काढले जायचे. पण त्यांचा चेहरा उजळ कसा राहायचा? तसेच त्यांना पिंपल्स किंवा चेहऱ्यासंबंधित समस्या असल्यास त्या काय वापरायच्या हे जाणून घेऊ.
पुर्वी महिला सुंदर दिसण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर करायच्या?
कोळशाच्या आयलायनर पुर्वी नाटकातल्या महिला मेकअपसाठी वापरायच्या. जे पापण्यांच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही लॅश लाईन्सवर लावले जायचे. कधीकधी महिला भुवया तयार करण्यासाठी बकरीच्या केसांचा वापर करायच्या. कारण पुर्वी जाड भुवया असणारी स्त्री सुंदर मानली जायची. कपाळ उंच करण्यासाठी भुवया आणि पापण्या काढणे ही एक सामान्य बाब होती.
चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यावर हळद लावली जायची. आजही कित्तेक महिला ही पद्धत वापरतात. याने चेहऱ्यावर शाईन आणि ग्लो सहज मिळवता येतो. त्याचसोबत त्वचा ग्लो करण्यासाठी बटाट्याचा वापर केला जायचा. हळद आणि बटाटा रगडल्याने चेहऱ्यावर सहज ग्लो येतो.
पुर्वी हळद फक्त चेहऱ्यावर नाही तर, कोणाला जखम झाली असेल, किंवा मुरुम, डाग, पिंपल्स, हायपरपिग्मेंटेशन यांसारख्या समस्या झाल्या असल्यास हळदीचा वापर करायच्या. त्याने काही दिवसातच त्यांना योग्य फरक जाणवायचा.
काळपट चेहऱ्यासाठी पुर्वी हळदीचाच वापर केला जायचा. पुर्वी बऱ्याच महिला कामानिमित्त शेतात किंवा उन्हाच्या संपर्कात असायच्या त्यामुळे त्यांचा चेहरा काळपट व्हायचा. त्यावेळेस महागडे प्रोटक्ट नसताना महिला हळद, बेसन वापरायच्या. तसेच खाण्यामध्ये त्याकाळी जंक फूड नसायचं तर जास्त रानफळ किंवा रानमेवा खाल्ला जायचा. तसेच पौष्टीक आहार सुद्धा योग्य वेळी त्यांना खायला मिळायचा. त्यामुळे महिला अधिक सुंदर आणि आकर्षित दिसायच्या.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.