
Vicky Kaushal: ११ मार्च १६८९ हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. या दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. शंभूराजांच्या हौतात्म्येला आज ३३६ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने शंभु राजांना आदरांजली वाहत ‘छावा’ फेम अभिनेता विकी कौशलने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये विकी कौशलने चित्रपटातील शेवटच्या प्रसंगाचा फोटो पोस्ट करुन लिहीले, आज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त, मी त्या योद्ध्याला वंदन करतो ज्याने शरणागतीपेक्षा मृत्यूची निवड केली, जो अकल्पनीय छळाला तोंड देत उभा राहिला आणि जो आपल्या श्रद्धांसाठी जगला आणि मरण पावला. काही भूमिका तुमच्यासोबत कायम राहतात आणि माझ्यासाठी छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकीच एक आहे. त्यांची कहाणी केवळ इतिहास नाही तर, ती धैर्य, त्याग आणि एक अमर आत्मा आहे जी अजूनही लाखो लोकांना प्रेरणा देते. जिंदा राहे! जय भवानी, जय शिवाजी! जय संभाजी
विकी कौशलच्या या भावनिक पोस्ट खाली त्याचे चाहते कमेंट करुन शंभु राजांना आदरांजली वाहत आहेत. त्याच्या एका चाहत्याने, देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।। ही कविता पोस्ट केली तर, एका नेटकऱ्याने रणधुरंधर महाबली धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन.. अशी कमेंट केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.