
Samantha Ruth Prabhu: सिने वर्तुळात स्टार्सच्या अफेअर्सबद्दल खूप चर्चा होतात. बहुतेक स्टार्स त्यांच्या नात्याची उघडपणे कबुली देत नाहीत, परंतु त्यांच्या एकत्र फिरण्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा वाढतात. आजकाल चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत.
समांथा रूथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यानंतर वर्षांनंतर तिच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा एन्ट्री केली आहे. गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये, ती तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत दिसली होती आणि आता पुन्हा एकदा तिचे आणि तिच्या नव्या बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
समंथा आणि राज पुन्हा एकत्र दिसले
ज्या व्यक्तीशी समांथा रूथ प्रभूचे नाव जोडले जात आहे ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू होय. अलिकडेच, समांथा आणि राज पुन्हा एकदा एकत्र दिसले त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली आहे. हा फोटो एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या ब्रंच दरम्यान काढला गेला आहे त्यामध्ये समांथा एका सुंदर हिरव्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर राज निदिमोरू कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही मित्रांसोबत पोज देत आहेत आणि राज सामंथाच्या अगदी मागे उभा आहे.
१ फेब्रुवारी रोजी समंथाने तिच्या इंस्टाग्रामवर वर्ल्ड पिकलबॉल लीग सामन्याचे फोटो शेअर केल्यानंतर समंथाने आणि राज निदिमोरू यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या. समांथा ही चेन्नई सुपर चॅम्प्स पिकलबॉल संघाची मालकिन आहे आणि यातील एका फोटोमध्ये ती राज निदिमोरूचा हात धरून चालताना दिसत आहे. या एका फोटोमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अटकळी लावल्या जात आहेत.
राज निदिमोरू कोण आहे?
राज निदिमोरू हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. तो राज आणि डीके या दिग्दर्शक जोडीचा भाग आहे, ज्यांनी 'द फॅमिली मॅन', 'फरझी', 'सिटाडेल: हनी बनी' आणि 'गन्स एन रोझेस' सारख्या लोकप्रिय वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे जन्मलेल्या राज यांनी भारतात इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.