Dhanshri Shintre
ओपनएआयने जाहीर केले आहे की ते भारतात आपले पहिले ऑफिस सुरू करणार आहेत. नवी दिल्लीमध्ये हे ऑफिस या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल.
जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश असल्याने, ChatGPT निर्माते OpenAI येथे आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी विस्तार योजना आखत असल्याचे समजते.
सीईओ सॅम ऑल्टमन यांनी जाहीर केले की ओपनएआय या वर्षाअखेर भारतात आपले पहिले ऑफिस सुरू करणार असून देशात नवे अवसर निर्माण होतील.
सॅम ऑल्टमन पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली आहे. ही घोषणा त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्टद्वारे केली.
भारतात एआयचा वापर वेगाने वाढतो आहे. गेल्या वर्षभरात चॅटजीपीटी यूजर्सची संख्या चौपट झाली असून, ओपनएआयला येथे अधिक गुंतवणुकीची उत्सुकता आहे.
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओपनएआयच्या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, एआय-आधारित परिवर्तनाच्या पुढील टप्प्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, इंडिया एआय मिशनच्या माध्यमातून देशात एआयसाठी सक्षम आणि मजबूत इकोसिस्टम उभारण्याचे काम सुरू आहे.
फेब्रुवारी महिन्यात अश्विनी वैष्णव यांनी सॅम ऑल्टमन यांची भेट घेतली होती. या बैठकीत भारताच्या एआय धोरण आणि भविष्यातील संधींवर सविस्तर चर्चा झाली.
NEXT: 'या' चूका केल्यास तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन होऊ शकते, जाणून घ्या नियम