Dhanshri Shintre
तुम्हाला कधी विचार आला आहे का की व्हॉट्सअॅप प्रत्येक महिन्यात लाखो अकाउंट्स लॉक का करते, यामागचे कारण काय आहे?
व्हॉट्सअॅप दर महिन्याला अहवाल जाहीर करते, ज्यात किती अकाउंट्सवर कारवाई झाली आणि त्यांची माहिती समाविष्ट असते.
सर्वप्रथम, चॅटिंग करताना समाजात द्वेष निर्माण करणारे कंटेंट टाळा, अन्यथा तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट ब्लॉक होऊ शकते.
व्हॉट्सअॅपवर खोटी माहिती फॉरवर्ड करू नका; कोणी तक्रार केल्यास तुमचे अकाउंट बॅन होण्याचा धोका असतो.
व्हॉट्सअॅपवर अश्लील कंटेंट शेअर करू नका; दुसऱ्या यूजर्सने तक्रार केली, तर तुमचे अकाउंट ब्लॉक होऊ शकते.
परवानगीशिवाय कोणालाही ग्रुपमध्ये अॅड करू नका; जर तक्रार आली तर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन होऊ शकते.
व्हॉट्सअॅपवर अनोळखी व्यक्तींना मेसेज पाठवू नका; तक्रार आल्यास तुमच्या अकाउंटवर व्हॉट्सअॅपने कारवाई करण्याची शक्यता आहे.