एकदा भेटशील का तिला...? स्वानंदी समर कधी येणार आमने सामने; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरी गोंधळात

Vin Doghatli Hi Tutena: झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या रोमांचक टप्प्यात दाखल झाली आहे. तेजश्री प्रधान या मालिकेत स्वानंदी आणि सुबोध भावे या मालिकेत समरची भूमिका साकारत आहेत.
Vin Doghatli Hi Tutena
Vin Doghatli Hi TutenaSaam Tv
Published On

Vin Doghatli Hi Tutena: झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या रोमांचक टप्प्यात दाखल झाली आहे. तेजश्री प्रधान साकारत असलेली स्वानंदी आणि सुबोध भावे साकारत असलेला समर यांच्या नात्याभोवती फिरणारी ही कथा आधीच लोकप्रिय ठरली असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमुळे मालिकेतील पुढील भागांविषयी चाहत्यांमध्ये आणखी उत्कंठा निर्माण झाली आहे.

प्रोमोमध्ये दाखवले आहे की, स्वानंदीवर एक अपमानास्पद प्रसंग ओढवतो. समरवरचा विश्वास ठेवते आश्रमातील काही घडामोडींमुळे तिच्यावर अपमानास्पद स्थिती येते. या घटनांमुळे दोघांमधील नातं अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. प्रेक्षकांना आता समर आणि स्वानंदी यांच्यातील नातं कसं पुढे सरकेल, त्यांचं एकत्र येणं होईल का, याची उत्सुकता लागली आहे.

Vin Doghatli Hi Tutena
War 2 Vs Coolie: गुरुवारी 'कुली'ने मारली बाजी; 'वॉर २'ने केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री, जाणून घ्या कलेक्शन

यापूर्वी मालिकेत दोघांमध्ये हळूहळू जवळीक निर्माण होत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. स्वानंदीला समरची साथ मिळेल असं वाटत असतानाच हा अपमान तिच्यासमोर नवं आव्हान उभं करतो. सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी या प्रोमोवर प्रतिक्रिया दिल्या असून, स्वानंदी आणि समर यांच्यात थेट भेट घडावा अशी मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली,एक आठवडा झाला तरी नायक नायिका भेटले नाही, नुसता timepass सुरु आहे, एकही positive scene झाला नाही serial मध्ये नुसती negativity आहे. तर, आणखी एकाने कमेंट केली, या मालिकेत खूपच गैरसमज आहेत. मी समर आणि स्वानंदीची भेट पाहण्यासाठी उत्सुकता.

Vin Doghatli Hi Tutena
Anita Advani And Rajesh Khanna: 'दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा स्पर्श...'; राजेश खन्ना यांच्या आठवणीत अनिता अडवाणी नेमकं काय बोलल्या?

वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये प्रेक्षक मालिकेच्या सुरुवाती पासूनच उत्सुक आहेत. आता या मालिकेत स्वानंदी आणि समरची भेट कधी होणार यासाठी चाहते वाट पाहत आहेत. स्वानंदी आणि समरची लव्हस्टोरी असलेली ही मालिका झी मराठीवर सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com