Manasvi Choudhary
लग्नसमारंभ, ऑफिस किंवा एखाद्या खास पार्टीमध्ये महिला सिल्कच्या साड्या नेसतात. सिल्कच्या साड्यांमध्ये बनारसी आणि रेशमी सिल्कच्या साड्या असतात
सिल्कच्या साड्यांना जरी वर्क, बारीक डिझाईन किंवा मोती-मणी असतात त्यामुळे या साड्या धुताना विशेष काळजी घ्यावी लागते.
सिल्कच्या साड्या या ड्राय क्लीन करणे महत्वाचे आहे. परंतु जर साडीच्या लेबलवर हाताने धुण्याची परवानगी असेल आणि साडीला केवळ हलका मळ लागला असेल, तर तुम्ही खालील स्टेप्सने घरीच धुवू शकता.
साडी धुण्यापूर्वी ती शुद्ध रेशमी किंवा बनारसी आहे का, त्यावर जरीवर्क, बारीक डिझाईन किंवा मोती आहेत का आणि रंग जाण्याची भीती आहे का याची तपासणी करा. रंग जाण्याची शक्यता किंवा नाजूक काम असल्यास साडी ड्राय क्लीन करणे महत्वाचे आहे.
साडी धुण्यासाठी एका टबमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात सिल्क साडी क्लीनर मिसळा. साडी पाण्यात ठेवून हळुवारपणे स्वच्छ करा; पाण्यात जास्त जोरात चोळू नका आणि जास्त वेळ भिजत ठेवू नका.
साडीवरचे अतिरिक्त पाणी काढण्यासाठी साडी स्वच्छ टॉवेलवर ठेवा आणि हलक्या हाताने पिळून घ्या.
जरी, सिक्वेन्स, मणी किंवा हातकाम केलेल्या साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यास नुकसानकारक ठरू शकतात. मशीनमध्ये धुतल्याने रंग किंवा धागे निघू शकतात; त्यामुळे अशा साड्या ड्राय क्लीनमध्ये द्याव्यात.
साडी धुतल्यानंतर वाळत घालताना थेट उन्हांमध्ये घालू नये, कारण त्यामुळे तिच्या रंग उडण्याची शक्यता असते. साडी पूर्णपणे सुकल्यानंतर ती मलमल किंवा सुती कापडात गुंडाळून ठेवा, ज्यामुळे साडीचा पोत आणि चमक टिकून राहते.