Year Ender 2024 saam tv
मनोरंजन बातम्या

Year Ender 2024 : अमिताभ बच्चन ते आमिर खान; कोणत्या अभिनेत्याने रिअल इस्टेटमध्ये केली मोठी गुंतवणूक?

Bollywood Actors Investements in 2024 : अमिताभ बच्चन ते आमिर खान सारख्या अभिनेत्यांनी मुंबईत विविध ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली आहेत. या अभिनेत्यांनी रिअल इस्टेटमध्ये कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईमध्ये रिअल इस्टेट बाजारातून प्रत्येक आठवड्याला कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याने डील केल्याचं वृत्त हाती येतंच. या रिअल इस्टेट बाजारात बॉलिवूडमधील कलाकारांचं नाव आघाडीवर असतं. बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार अभिनेत्यांनी मुंबईत अनेक बड्या रिअल प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. एकीकडे मुंबईत प्रॉपर्टीचे भाव गगनाला भिडत आहेत. मात्र, दुसरीकडे २०२४ साली मुंबईत अनेक सुपरस्टार आणि अभिनेत्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. यावर्षी कोणत्या अभिनेत्याने मुंबईत प्रॉपर्टी खरेदी केली, याची माहिती जाणून घेऊयात.

बच्चन कुटुंबाची रिअल इस्टेट गुंतवणूक

बच्चन कुटुंबाकडे आधीपासून मुंबईत कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांनी २०२४ साली मुंबई महानगर क्षेत्रात रिअल इस्टेटमध्ये १०० कोटींहून अधिक किंमतीची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. बच्चन कुटुंबाने मुंबईच्या मुलुंड पश्चिममध्ये २४.९५ कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली. या अपार्टमेंटमध्ये एकूण १०,२१६ चौरस फूट जागा आहे. या बच्चन कुटुंबाच्या पोर्टफोलियोमध्ये ओशिवारा आणि मागाठाणे (बोरीवली पूर्व) या संपत्तीचाही समावेश आहे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा समावेश आहे.

शाहीद कपूर आणि मीरा कपूर

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूरने मे महिन्यात मुंबईच्या वरळी भागात ओबेरॉय ३६० वेस्ट प्रोजेक्टमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. एका रिपोर्टनुसार, त्यांनी ५८ कोटींहून अधिक किंमतीचा एक लक्झरी सी-व्ह्यू अपार्टमेंटची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी वरळीची ही प्रॉपर्टी महिना २० लाख रुपये भाड्याने दिले आहेत.

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणने या वर्षी मुंबईत रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली. रिपोर्टनुसार, दीपिकाने फर्म केए एंटरप्राइजेजच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये वांद्रे पश्चिम भागात १७.८ कोटी रुपयांची अपार्टमेंटची खरेदी केली. ही प्रॉपर्टी १८४५ चौरस फूटाची आहे. कागदपत्रानुसार, दीपिकाने अपार्टमेंटमध्ये सागर रेशम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या १५ व्या मजल्यावर आहे. ही प्रॉपर्टी शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याजवळ आहे.

आमिर खान

आमिर खानने जूनमध्ये २०२४ वांद्रे येथील पाली हिल भागात १,०२७ चौरस फूटाची रेडी-टू-मूव्ह अपार्टमेंट खरेदी केलं होतं. आमिर खानने तब्बल ९ कोटींहून अधिक प्रॉपर्टी खरेदी केली होती. ही नवी प्रॉपर्टी बेला विस्टा अपार्टमेंटमध्ये स्थित आहे. आमिर खानचीही मुंबईत विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे.

सेलिब्रिटी कधी प्रॉपर्टी खरेदी करतात?

रिअल इस्टेट एक्सपर्टनुसार, प्रोजेक्टच्या सुरुवातीच्या टप्प्यात किंवा पझेशन मिळणार असेल, तर बॉलिवूडचे स्टार, अभिनेते हे प्रॉपर्टी खरेदी करू इच्छितात. व्यावसायिक प्रॉपर्टी खरेदी करण्याचाही सेलिब्रिटींचा कल असतो. अमिताभ बच्चन, मनोज वाजपेयी, सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि अजय देवगण सारखे बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी अंधेरी भागात व्यावसायिक गाळे खरेदी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

SCROLL FOR NEXT