ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२०२४मध्ये लापता लेडीज, स्त्री 2, मैदान, मुंज्या, अमर सिंह चमकिला, चंदु चॅम्पियन, हनु-मान आणि महाराजा सारखे सिनेमे रिलीज झाले.या सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सामाजिक मुद्द्यांवर आधारित लापता लेडीज १ मार्च २०२४मध्ये रिलीज झाला. ग्रामीण भागातील जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. ट्रेनमध्ये दोन नवरींच्या अदलाबदल होते.आणि त्यानंतर होणारा गोंधळ आणि कॅामेडी ही प्रेक्षकांचे मनोरंजन करते.
स्त्री २ हा २०१८ मध्ये रिलीज झालेला स्त्री सिनेमाचा सीक्वल आहे. १४ ऑगस्टला रिलीज झालेल्या हॅारर- कॅामेडी सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.
भारतीय फुटबॅालला उंचावर घेऊन जाणारे कोच सैयद अब्दुल रहीमच्या जीवनावर बनलेला हा सिनेमा १० ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज झाला. IMDb वर या सिनेमाला 8/10 रेटींग आहे.
भारतीय पॅाप स्टार अमर सिंह चमकीला आणि अमरजोत कौरच्या वास्तविक जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.या सिनेमामध्ये दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोपरा मुख्य भूमिकेत आहे.
कार्तिक आर्यनचा अॅक्शन स्पोर्ट सिनेमा चंदु चॅम्पियन हा सिनेमा मुरलीकांत पेटका यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. त्यांनी देशासाठी पहिले ऑलम्पिक पदक जिंकले होते. १४ जूनला हा सिनेमा रिलीज झाला होता.
विजय सेतुपति आणि अनुराग कश्यपचा अॅक्शन थ्रिलर सिनेमा 'महाराजा' १४ जून २०२४ ला सिनेमागृहात रिलीज झाला. हा सिनेमा 8.5 च्या रेटींगसह IMDbच्या लिस्टमध्ये टॅापवर आहे.
१२ जानेवारीला रिलीज झालेला हनुमान एक अॅक्शन- अॅडव्हेंचर सिनेमा आहे. अंजनाद्री भूमीवर राहणाऱ्या एका नायकाची कथा आहे. ज्याला देव हनुमानाची शक्ती प्राप्त होते. ही एक काल्पनिक कथा आहे.
NEXT: नवीन वर्षाच सेलिब्रेशन बनवा आणखी खास ; भारतातील 'या' समुद्रकिनाऱ्यांना द्या भेट