ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात शांतिपूर्ण वातावरणात करायची असेल तर आज आम्हा तुम्हाला अशाच काही समुद्रकिनाऱ्याबद्दल सांगणार आहोत जेथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करु शकता.
हॅवलॅाक बेटावर असलेले राधानगर बीच हे आशियामधील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपेकी एक आहे. सफेद वाळू आणि निळे पाणी या बीचचे वैशिष्ट्य आहे.
उंच डोंगर, चारही बाजूंनी नारळाची झाडे आणि शांतिपूर्ण वातावरणामध्ये तुम्ही नवीन वर्ष साजरा करु शकता.
मालपे बीचच्या तटापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले हे सेंट मेरी बेट ज्वालामुखीच्या गतिविधीमुळे बेसॅाल्ट खडकापासून तयार झालेले हे सेंट मेरी बेट एक नैसर्गिक आश्चर्य आहे.
लक्षद्विपमधील बंगाराम बीचवर तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळेल. निळे पाणी, साफ बीच आणी शांतिपूर्ण वातावरणासह तुम्ही येथे वाटर स्पोर्टस अॅक्टिव्हिटी देखील करु शकता.
जंगलाच्या मधोमध असलेले हे बीच समुद्री जीवन,स्वच्छ पाणी आणि सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय या बीचवर तुम्हाला फुलपाखरु उडताना दिसतील.
मंदारमणि हे पश्चिम बंगालमधील कमी गजबजलेले बीच आहे. कमी गर्दी आणि, नैसर्गिक सुंदरतेसाठी हे बीच प्रसिद्ध आहे.
या बीचवर पोहोचण्यासाठी तुम्हाला पुद्दुचेरीपासून फेरीने प्रवास करावा लागेल. सोनेरी वाळू,साफ पाणी आणि कमी गर्दी असलेले पॅराडाइज बीच नवीन वर्ष साजरा करण्यासाठी एक योग्य जागा आहे.
NEXT: कोणत्या आहेत 2024च्या मस्ट वॉच वेब सीरिज; एकदा तरी पाहायलाच हव्यात