ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२०२४मध्ये वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॅार्मवर अनेक वेब सीरीज रिलीज झाले. IMDb ने २०२४मधील टॅाप वेब सीरीजची लिस्ट जाहीर केली आहे.
संजय लीला भंसालीची हिरामंडी वेब सीरीज या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.आणि 2024ची हीट वेब सीरीज ठरली.या सीरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, रिचा चढ्ढा, आणि आदिती राव हैदरी सारखे मोठे कलाकार मुख्य भूमिकत आहे.
बदला, सत्तासंघर्ष आणि क्राइम ड्रामाने भरपूर मिर्जापूर ३ने आपल्या जबरदस्त कथा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मिर्जापूर १, आणि मिर्जापूर २नंतर मिर्जापूर ३ वेब सीरीज सुद्धा सुपरहीट झाली.
पंचायत १ आणि २ सीझननंतर पंचायत सीझन ३ ने हलक्या फुलक्या कॅामेडी आणि रंजक कथेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पंचायत सीझन ३ IMDbच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या लिस्टमध्ये टॅापवर आहे.
ग्यारह ग्यारह ही वेब सीरीज कोरिअन ड्रामा सिंगल वर आधारित आहे. सस्पेंस आणि अद्वितीय कथेमुळे प्रेक्षक या वेब सीरीजचे चाहते झाले.
जियो सिनेमावर रिलीज झालेल्या या सीरीजने प्रेरणादायी आणि भावनिक कथेने अनेकांना प्रभावित केले.
अॅमेजॅान प्राइमच्या बॅनरखाली बनलेली सिटाडेल हनी बनी वेब सीरीजमध्ये वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहे. ही अॅक्शन- थ्रिलर सीरीज अनेक भाषेत रीलीज झाली.
युट्युबर भुवन बामची वेब सीरीज ताजा खबर कॅामेडी आणि ड्रामाचा मिश्रण आहे. एका माणसाला रहस्यमय शक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनात होणाऱ्या उलथापालथेवर ही कथा आधरित आहे.
NEXT: न्यू ईयर, ख्रिसमससाठी ट्रिप प्लॅन करताय? मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट