ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवीन वर्ष आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी अनेकजण आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह फिरायला जाण्याचा प्लान करतात.
जर तुम्ही देखील न्यू ईयर आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लान करत आहात तर आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जेथे तुम्ही सेलिब्रेशनसाठी जाऊ शकता.
ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी गोवा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. येथे होणारी बीच पार्टी अनेकांना आकर्षित करते.
ज्यांना आपल्या कुटुंबासोबत निसर्गरम्य वातावरणात ख्रिसमस किंवा नवीन वर्ष साजरा करायचा आहे त्या लोकांसाठी उटीहे बेस्ट ठिकाण आहे.
येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. बर्फवृष्टीचा आनंद घेत नवीन वर्षाचा स्वागत करण्यासाठी मनालीपेक्षा सुंदर दुसरे ठिकाण नाही.
शिलाँग हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. येथे ख्रिसमस आणि न्यू ईयर उत्साहात साजरा केला जातो.
फ्रेंच संस्कृती, चर्च आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले पुड्डुचेरी ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाटी एक उत्तम ठिकाण आहे.
लेकसाइड कॅम्पिंग ते पूलसाइड पार्टी, सेलिब्रेशनसाठी मुंबई हे उत्तम ठिकाण आहे.
NEXT: आहारात 'या' भाज्यांचा समावेश करा; व्हिटॅमिन बी १२ची कमतरता होईल पूर्ण