Aamir Khan: बॉलिवूड स्टार आमिर खान एका चित्रपटासाठी घेतो तब्बल १०० कोटींचे मानधन; संपत्तीचा आकडा वाचून डोळे फिरतील
बॅलिवूड इंडस्ट्रीमधील आमिर खान एक उत्तम अभिनेता आहे. आमिर खान एक उत्कृष्ट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. अभिनेत्याने अनेक चित्रपटात काम करुन सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आमिर खानच्या दमदार अभिनयाला सर्व चाहत्यांची खूप पंसती मिळाली आहे. अभिनेता आमिर खानचे पीके, दंगल, ३ इडियट्स , तारे जमीन पर यांसारखे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आमिर खान त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे सोशल मिडियावर नेहमी चर्चेत असतो. सध्या बॅलिवूडच्या उत्कृष्ट कलाकाराची संपत्ती थक्क करण्यासारखी आहे. आमिर खानची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊयात.
आमिर खान चित्रपट, रिअल इस्टेट ,व्यवयाय आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून पैसे कमवत असतो. अभिनेता एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतो. त्याचबरोबर एका जाहिरातीसाठी सुमारे १० ते १२ कोटी रुपये घेते. अभिनेत्याचे दंगल, लगान, ३ इडियट्स यांसारखे चित्रपट ब्लॅाकबस्टर ठरले आहेत. आमिरने त्या ब्लॅाकबस्टर चित्रपटांमधून दमदार कमाई केली आहे.आमिर खानची अनेक ठिकाणी मालमत्ता देखील आहे. अभिनेत्याचे बेव्हरली हिल्स मॅन्शन मध्ये ७५ कोटी रुपयांचे अलिशान घर आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात आमिर खानचे सुदंर घर आहे. वांद्रेमधील आमिर खानच्या घराची किंमत ६० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पाचगणी परिसरात एक भव्य असे फार्महाउस देखील आहे. पाचगणीमधील फार्महाउसची किंमत ७ कोटी रुपये आहे.
अभिनेता आमिर खानची मॅट्रिक पार्टनर्स , कलारी कॅपिटल यांसारख्या कंपन्यामध्ये गुंतवणूक आहे. त्याचबरोबर आमिरने Filpkart, Jabong, CommonFloor ब्रँडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर अभिनेत्याची बंगळुर फर्निचर रेंटल कंपनी फर्लेन्कोमध्ये २ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. आमिरला लक्झरी वस्तू आणि महागड्या कारची प्रचंड आवड आहे. आमिरकडे मर्सिडीज बेंझ s600 कार आहे. या कारची किंमत सुमारे १०.५० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर आमिर खानकडे रोल्स रॅायस घोस्ट कार आहे. या कारची किंमत सुमारे ७.९५ कोटी रुपये आहे. आमिरच्या यशामुळे आज तो १८६२ कोटी रुपयांचा मालक आहे.