Vijay Sethupathi  Saam tv
मनोरंजन बातम्या

Vijay Sethupathi : अरे बापरे! 'महाराजा'ने कमावले 100 कोटी; विजय सेतुपतीच्या 50 व्या सिनेमाची इतकी चर्चा का? वाचा सविस्तर

vijay sethupathi Maharaja movie : विजय आणि अनुराग कश्यपच्या 'महाराजा'ने कमावले 100 कोटी कमावले आहेत. सेतुपतीच्या 50 व्या सिनेमाची इतकी चर्चा का? वाचा सविस्तर

Parag Kharat

मुंबई : साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपतीचा महाराजा सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र जोरदार सुरू आहे. बॉलीवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या अभिनयाचीही चर्चा सुरू आहे. OTT वर महाराजाची क्रेज आहे. बॉक्सऑफिसवर कोणता सिनेमा चालेल सांगू शकत नाही. मोठ्या बजेटचे सिनेमे चालत नाहीत. तर काही सिनेमे कमी बजेट असूनदेखील जास्त गल्ला कमवतात. आता महाराजा सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर विजय सेतुपतीचा हा 50 वा सिनेमा आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आता OTT वर या सिनेमाने धूमाकूळ घातलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं काय आहे या सिनेमात जो कमी वेळेत चर्चेत आला. लोकं त्याची स्तुती करणं थांबत नाहीत.

फिल्मविषयी बोलूयात...

सिनेमात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं नाव महाराजा आहे आणि त्याच्यावरच हा सिनेमा आहे. सुरवातीला एका अपघातात त्याच्या पत्नीचं निधन होतं. मुलगी अपघातातून वाचते. महाराजा एका सलूनमध्ये काम करून आपल्या मुलीच पालनपोषण करण्यातच आपलं जीवन घालवतो. त्यातच दुसऱ्या बाजूला सेलवमच्या भूमिकेतील अनुराग छोटं-मोठं काम करून आपल्या छोट्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असतो. कुटुंबाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वाईट मार्गाने पैसा कमवतो. आपण पैसा कसा कमवतो याची चुणूक तो कोणालाही लागू देत नाही.

विजय सेतुपती आणि सेलवम यांच्यात एक गैरसमज होतो. त्यांच्याभोवतीच या सिनेमाची रूपरेषा तयार केली आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना हादरवून सोडलं आहे. सिनेमात दोन बाप दाखवलेत एक प्रेमळ आणि एक राक्षसी वृत्तीचा. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन निथीलन स्वामिनाथन यांनी केले आहे. यात 'लक्ष्मी' या कचऱ्याच्या डब्याभोवती सिनेमा फिरतो. या सिनेमात दोनदा सापाचं दृश्य दाखवलं आहे. याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. साप जसा आपल्या पिल्लांना ओळखत नाही, त्यांना खाऊन टाकतो. त्याप्रमाणे डायरेक्टरनं अनुराग कश्यपची तुलना केली आहे.

बॉक्सऑफिसवर महाराजाची कमाल

भारतीय बॉक्स ऑफिसवर महाराजाची सर्व भाषा पकडून एकूण निव्वळ कमाई 72 कोटी आहे. मुख्य तमिळ आवृत्तीनं सुमारे 57 कोटी तर तेलुगू आवृत्तीचे योगदान 14 कोटींहून थोडे अधिक असल्याचं समजतं. महाराजा फक्त 20 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेलाय. तर, या खर्चाच्या तुलनेत, त्याने 52 कोटी नफा कमावला आहे. 260% बरोबरीचं आहे. देशांतर्गत संकलन ट्रेंडिंग करांसहित एकूण 84.96 कोटीची कमाई आहे. या चित्रपटाने परदेशातही 25 कोटींची कमाई केलीय. जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 109.96 कोटी इतकं कलेक्शन केलं आहे.

सिनेमा बनवताना तो असाच झाला तसाच झाला पाहिजे, असं काही नाही. महाराजा सिनेमात सिनेमा कुठून सुरू झाला? त्याची स्टोरी कुठे चालली आहे, काही समजत नाही. त्यासाठी बारकाईने पाहायला हवा. गुंतागुतीचा आणि कन्फ्युज हा करणारा सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तो लक्ष देवून पहावा लागतोय.

दक्षिणेत विजय सेतुपतीची क्रेज

साऊथमध्ये विजय सेतुपतीची क्रेज आहे. मागच्या काही काळात तो फेमस झालाय. महाराजाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे विजय सेतुपतींचा 50 वा सिनेमा आहे. अशातच प्रेक्शकांनी या सिनेमासाठी भरभरून दिलेली दाद महत्वाची आहे. OTT वर सिनेमा आला आणि बघता-बघता संगळ्यांच्याच पसंतीस उतरला आहे.

अनुराग कश्यपचा अभिनही जबरदस्त आहे. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनुराग कश्यप यांना असा अभियन करताना पाहिलं नाही, पण या सिनेमात पहिल्यांदा चांगला अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनयाबाबत त्याने खूप सिरिअसली घेतलं आहे. महाराजा ज्यांनीही पाहिला आहे ते अनुराग कश्यपच्या अभिनयाची स्तुती करणं थांबत नाहीत.

पोलिसांचा प्रामाणिकपणा

अलीकडच्या अनेक सिनेमात नायकाला पोलिसाच्या मुख्य भूमिकेत दाखवलं आहे. अजय देवगणचा सिंघम, सलमान खानचा गर्व, रणदीप हुड्डाची वेब सिरीज इंस्पेक्टर अविनाश. तर काही सिनेमे असे असतात की त्यात पोलिसांची प्रतिमा काही चांगली दाखवत नाहीत. एक सामान्य माणूस आपल्या न्यायासाठी हक्कासाठी पोलिसांसमोर लोटांगण घालतो. पण त्याला न्याय मिळत नाही. महाराजा सिनेमात भ्रष्ट पोलिसांचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.

महाराजा सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पाहा. मराठीत सैराट सिनेमा खूप लोकांच्या पसंतीस उतरला होता. त्या सिनेमाचा शेवटचा सीन बघून प्रेक्षकांना धक्का बसला होता. महाराजा सिनेमाचा शेवटचा सिन ही धक्कादायक आहे. सस्पेन्स, थ्रिलर सिनेमा पाहायची आवड असेल तर महाराजा नक्की बघा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT