South Indian Saree : या 'खास' साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात; जाणून घ्या साऊथ इंडियन साड्यांचे भन्नाट प्रकार

Different Types of South Indian Sarees : साऊथ इंडियनच्या ट्रेंडिंग साडया कोणत्या ? आणि लग्नसराईत कोणत्या प्रकारच्या साडया खरेदी करायला हव्यात हे आपण आज जाणून घेणार आहोत.
Different Types of South Indian Sarees
South Indian SareeSaam TV
Published On

लग्नसराईत, कार्यक्रमात, विशेष समारंभात स्त्रिया साडी नेसण्याला जास्त पसंती देतात त्यातही साऊथ इंडियन साडीला पहिलं प्राधान्य देतांना दिसत आहे. सद्या साऊथ इंडियन साडीचा ट्रेंड सुरू आहे. पण लग्नसराईत, साखरपुड्यात, कोणत्या साऊथ इंडियन साडी विकत घ्यावे हे मुळात कळतंच नाही, तुमचाही असाच गोंधळ होतोय का ? म्हणजे आपली साडी ही इतरांपेक्षा वेगळी असावी, तिची डिझाईन, रंग, साडीची बॉर्डर ही वेगळी असावी असं तुम्हांला ही वाटतं का? साऊथ इंडियनच्या ट्रेंडिंग साडया कोणत्या ? आणि लग्नसराईत कोणत्या प्रकारच्या साडया खरेदी करायला हव्यात हे आपण आज जाणून घेणार आहोत.

Different Types of South Indian Sarees
South Africa: लागोपाठ 6 सामने जिंकूनही दक्षिण आफ्रिकेवर टांगती तलवार! सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

म्हैसूर सिल्क साडी

दक्षिण भारतीयांसाठी म्हैसूर सिल्क साडी सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. ह्या वजनाने हलक्या आणि नेसायला सोप्या असतात.साखरपुड्यात, पूजेला आपण म्हैसूर सिल्क साडी खरेदी करू शकतो.

चेत्तीनाड साडी

साऊथ इंडियन साड्यांमध्ये चेत्तीनाड साडी ही दुसऱ्या प्रकारात मोडते. या साडीचा काठ खूपच सुंदर असतो आणि त्यावर बारीक आकाराच्या बुट्टीचं अप्रतिम डिजाईन केलेली असते. जर तुम्ही लग्नासाठी अश्या प्रकारचे साडी घेणार असाल तर, गडद रंगाचे साडी घ्याल कारण गडद रंग हा उठून दिसतो.

कांजीवरम साडी

कांजीवरम साडीला कांचीपुरम साडी म्हणतात. यासाड्या खास लग्नसराईसाठी वापरल्या जातात. या साड्या खुपच हलक्या असतात.कांजीवरम साड्यांमध्ये अनेक प्रकार असतात. ही साडी चापून चुपुन नेसली की आपण सुंदर तर दिसतोच त्याचबरोबर आपला लुकही आकर्षक दिसतो . कांजीवरम साडीला सद्या सर्वाधिक जास्त प्रमाणात पसंती आहे.

धर्मावरम साडी

ह्या साडी आंधरप्रदेशच्या धर्मावरम गावात हाताने विणल्या जातात. या साडीचा काठ मोठा असतो, सिल्वर आणि गोल्डन रंगाचे काठ असतात. थोडंफार बनारसी साड्या प्रमाणे दिसून येतो. या साड्या जास्त वजनाचे असतात अशा साड्या नवरीसुद्धा नेसतात या साडीमध्ये त्यांचे सोंदर्य अजूनच खुलून दिसतं.

साऊथ इंडियन साडीचे वैशिष्ठ म्हणजे या साड्यांचे बॉर्डर हे 10 सेमी ते 15 सेमी असतात. याचबरोबर कासवू, गडवाल पोचमपल्ली अशा अनेक प्रकारचे साऊथ इंडियन साड्या आहेत ज्या आपण लग्नसराईत, विशेष कार्यक्रमात नेसल्यावर आपल्याला आकर्षक असा लुक देतात म्हणूनच सद्या साऊथ इंडियन साड्यांचा सर्वाधिक ट्रेंड पाहायला मिळत आहे.

Different Types of South Indian Sarees
South Indian Actress: डोळ्यात काजळ, काळी साडी; कोण आहे ही? जी दिसते इतकी भारी!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com