Vishal Brahma  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vishal Brahma : टायगर श्रॉफसोबत काम, अरबाजला नडला; ड्रग्समध्ये अडकलेला 'तो' अभिनेता कोण?

Who Is Vishal Brahma : ड्रग्समध्ये अडकलेला बॉलिवूड अभिनेता विशाल ब्रह्मा कोण, जाणून घेऊयात. त्याच्या विषयी सविस्तर माहिती वाचा.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विशाल ब्रह्मा ड्रग्स प्रकरणात अडकला आहे.

विशालला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मुळे खूप लोकप्रियता मिळाली.

विशालने बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत काम केले आहे.

विशाल ब्रह्माला (Vishal Brahma) 40 कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने त्याला चेन्नई विमानतळावर अटक केली. त्याच्याकडून ४० कोटी रुपयांचे (सुमारे १.४ अब्ज डॉलर्स) मेथाकॅलोन नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

मीडिया रिपोर्टनुसार, विशाल ब्रह्मा सिंगापूरहून परतत होता आणि चेन्नई विमानतळावर उतरताच डीआरआयच्या पथकाने त्याला अटक केली. विशाल एका नायजेरियन टोळीसाठी काम करत होता आणि त्यांच्या संपर्कात होता असा दावा केला जात आहे. विशालला कंबोडियाला मोफत प्रवासाचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. परंतु त्याला फक्त ड्रग्ज असलेली ट्रॉली बॅग घेऊन परतावे लागले. विशालला पैशांचे आमिष दाखवण्यात आले. विशालला एका नायजेरियन ड्रग्ज सिंडिकेटने अडकवले.

विशाल ब्रह्मा कोण?

विशाल ब्रह्माला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपट 2019 ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्यासोबत काम केले. चित्रपटात त्याने सम्राटची भूमिका साकारली. तो सहाय्यक अभिनेता आहे. त्यानंतर तो 'बिहू अटॅक' चित्रपटात दिसला. आजवर विशालने चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. विशाल ब्रह्मा 32 वर्षांचा आहे. अभिनयात येण्यापूर्वी तो मॉडेलिंग करत होता.

विशाल ब्रह्मा मूळचा आसामचा रहिवासी आहे. विशाल ब्रह्माने 'बिहू अटॅक' चित्रपटाच्या निर्मात्यांवर पैसे न देण्याचा आरोप केला होता. त्याने दावा केला की, तो संपूर्ण महिना स्वतःच्या खर्चाने सेटवर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगांवच्या मेहरूण तलावातील घटना

Munawar Farooqi: मुनव्वर फारुकीला जीवे मारण्याचा प्लॅन, दिल्लीतून दोन शूटर्सना अटक; पोलिसांनी सांगितला संपूर्ण प्रकार

निलेश घायवळचा नवा प्रताप! त्याच्या अन् बायकोच्या नावे ४ मतदान ओळखपत्र, एक पुण्यात तर दुसरे नगरमध्ये; नावात बदल करत...

Road Accident: भारतात सर्वात जास्त रस्ते अपघात कोणत्या शहरात नोंदवले जातात? सर्वाधिक धोकादायक शहर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT