Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Baaghi 4 vs The Bengal Files Box Office Collection Day 2 :'बागी ४' आणि 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाने वीकेंडला किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.
Baaghi 4 vs The Bengal Files Box Office Collection Day 2
Baaghi 4 vs The Bengal FilesSAAM TV
Published On
Summary

थिएटरमध्ये 'बागी ४' आणि 'द बंगाल फाइल्स' चित्रपट पाहायला मिळत आहेत.

'बागी ४'ने कलेक्शनमध्ये 'द बंगाल फाइल्स'ला मागे टाकले आहे.

वीकेंडला 'बागी ४'च्या कलेक्शनमध्ये घट झालेली दिसत आहे.

5 सप्टेंबरला थिएटरमध्ये दोन चित्रपट रिलीज करण्यात आले. टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) 'बागी 4' (Baaghi 4) आणि पल्लवी जोशीचा (Pallavi Joshi) 'द बंगाल फाइल्स' (The Bengal Files) दोन्ही चित्रपटाने वीकेंडला शनिवारी किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात. पहिल्या दिवसाच्या तुलनेत 'बागी ४'च्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

'बागी 4' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

'बागी 4'ने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'द बंगाल फाइल्स'ला मागे टाकून कोट्यवधींची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी 4'ने पहिल्या दिवशी 12 कोटींची बंपर कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 9 कोटी रुपये कमावले. दोन दिवसांत चित्रपटाने तब्बल 21 कोटींची कमाई केली आहे.

'द बंगाल फाइल्स' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

मीडिया रिपोर्टनुसार, 'द बंगाल फाइल्स' रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी वीकेंडला सिनेमाने 2.25 कोटी रुपये कमावले. दोन दिवसांत चित्रपटाने तब्बल 4 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'बागी 4'

'बागी 4' ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात टायगर श्रॉफसोबत सोनम बाजवा,संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत. 'बागी 4' ए. हर्ष दिग्दर्शित चित्रपट आहे. बागी फ्रँचायझीचा 'बागी 4' सीक्वल आहे. संजय दत्त चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. हरनाज संधू हिने 'बागी 4' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी 4' 200 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

'द बंगाल फाइल्स'

'द बंगाल फाइल्स' चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री पल्लवी जोशीने केली आहे. तसेच विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शन केले आहे. 'द बंगाल फाइल्स' सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात होता. 'द बंगाल फाइल्स' चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, पुनित इस्सर हे कलाकार पाहायला मिळत आहेत.चित्रपट बंगाल दंगली आणि नोआखाली हत्याकांडावर आधारित आहे.

Baaghi 4 vs The Bengal Files Box Office Collection Day 2
'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com