'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

Awez Darbar Propose Nagma Mirajkar : 'बिग बॉस 19'च्या घरात अवेज दरबारने नगमा मिराजकरला प्रपोज केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Awez Darbar Propose Nagma Mirajkar
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19'च्या घरात प्रेम कहानी सुरू झाली आहे.

अवेज दरबारने नॅशनल TVवर नगमा मिराजकरला प्रपोज केले आहे.

अवेज दरबार आणि नगमा मिराजकर हे सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहेत.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. यंदा बिग बॉसच्या घरात सोशल मिडिया इन्फ्लुएंसर कपल नगमा मिराजकर आणि अवेज दरबारची एन्ट्री झाली आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अवेज दरबारने नॅशनल TVवर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने गुडघ्यावर बसून नगमा मिराजकरला प्रपोज केले आहे.

'बिग बॉस 19'च्या घरात अवेज दरबारने (Awez Darbar) नगमा मिराजकरला (Nagma Mirajkar) प्रपोज करून आपल्या मनातल्या भावना सांगितल्या आहेत. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नगमा - अवेज गार्डन एरियात उभे असतात. नगमाचे डोळ्याला पट्टी बांधलेली असते. तेव्हा घरातील इतर सदस्य लपलेले असतात. अवेज गुडघ्यावर बसून फुलगुच्छ देऊन नगमा मिराजकरला प्रपोज करतो. तो तिच्यासाठी हार्ट शेपचे कलिंगड कापतो आणि तिला देतो. तसेच तिच्यासाठी रोमँटिक गाणे गातो.

अवेज दरबार 'बिग बॉस 19'च्या घरात सर्वांसमोर नगमाला 'आय लव्ह यू' बोलतो. घरातील इतर सदस्य त्यांच्या आनंदात सहभागी होताना दिसतात. अवेजचे सरप्राइज पाहून नगमा भावुक होऊन रडू लागते आणि त्याला मिठी मारते. अवेज दरबार या आठवड्यात नॉमिनेट झाला होता. त्यामुळे घरातून बाहेर जाण्यापूर्वी नगमाला सरप्राइज देण्यासाठी त्याने हा प्लान करा. अवेज-नगमाच्या व्हिडीओवर चाहते आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अवेज दरबार आणि नगमा मिराजकर हे खूप वर्षांपासून सोबत आहेत. ही दोघे एकत्र डान्स व्हिडीओ बनवतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. चाहते आता त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यांनी एकत्र खूप ट्रॅव्हल केले आहे. कायम एकमेकांना पाठिंबा देताना हे कपल दिसते. आता बिग बॉसने दुसऱ्या आठवड्यातील एलिमिनेशन रद्द केल्यामुळे अवेज दरबार सुरक्षित झाला आहे. त्यामुळे हे कपल घरात कोणता राडा घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Awez Darbar Propose Nagma Mirajkar
Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com