Bigg Boss 19: 'मी पोलिसांना वाचवले...; बिग बॉस १९ मधील तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली, पाहा VIDEO

Bigg Boss 19 Tanya Mittal: बिग बॉस १९ मधील सर्वात चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक तान्या मित्तल आहे. या शोमध्ये तिच्या वेगवेगळ्या आणि विचित्र वक्यव्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहेत.
Bigg Boss 19 Tanya Mittal
Bigg Boss 19 Tanya MittalSaam Tv
Published On

Bigg Boss 19: सलमान खानच्या वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १९ मध्ये दिसल्यापासून कंटेंट क्रिएटर तान्या मित्तल चर्चेत आहे. कोणत्याही धमक्या न मिळाल्यानेही उच्च सुरक्षेत राहण्यापासूनची बढाई मारण्यापासून ते तिच्या कुटुंबाने तिला 'बॉस' म्हणण्यापर्यंत, तिच्या विधानांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता, तिने दावा केला आहे की २०२५ च्या प्रयागराज येथील महाकुंभ चेंगराचेंगरीच्या वेळी तिने १० ते ११ पोलिसांना वाचवले.

महाकुंभ चेंगराचेंगरीच्या वेळी तान्या मित्तलने पोलिसांना वाचवले

अलिकडच्या भागात, ती सह-स्पर्धक गौरव खन्नाशी महाकुंभ दरम्यान तिने लोकांना कसे वाचवले याबद्दल बोलताना दिसली. कुंभ मेळाव्यादरम्यान तान्याने १० ते ११ पोलिस अधिकाऱ्यांना वाचवल्याचा दावा यावेळी तिने केला. ती म्हणाली, महाकुंभ मेळ्यात मी अनेक लोकांचे आणि पोलिसांचे प्राण वाचवले असे स्वतः तिथे असलेले पोलीस अधिकारी स्वत: म्हणाले होते "

Bigg Boss 19 Tanya Mittal
Jolly LLB 3: अक्षय-अरशदच्या 'जॉली एलएलबी ३' ला कोर्टाकडून दिलासा; चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

हे ऐकून गौरव खन्नाने तिला तु कसा लोकांचा जीव कसा वाचवला असे विचारले. यावर तिने उत्तर दिले, 'माझ्या सोबत नेहमी पर्सनल सिक्युरिटी तसेच पोलीस अधिकारी असतात ज्यांना बचावाचे प्रशिक्षण दिले गेले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि मुलाखतीचे व्हिडिओ देखील आहेत जे हे दर्शवतात. स्थानिक पोलिसांनीही एका मुलाखतीत पुष्टी केली की मी त्यांचे प्राण वाचवण्यास मदत केली होती.

Bigg Boss 19 Tanya Mittal
Baaghi 4 Review: टाइगर श्रॉफचा 'बागी ४' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

गौरव खन्नाने विचारले की तुला सन्मानित करण्यात आले पाहिजे

त्यानंतर गौरव म्हणाला या धाडसासाठी तिला पुरस्कार मिळायला पाहिजे, त्यावर तान्याने उत्तर दिले की तिला कोणतेही पुरस्कार मिळणार नाहीत कारण बहुतेक सगळे व्हिडिओ टेप्स नष्ट झाले आहेत. तिने नमूद केले की घटनेच्या वेळी तिची मुलाखत घेतलेल्या अनेक मोठ्या वृत्तसंस्थांकडे हे टेप्स नक्की असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com