Karan Johar: 'स्टुडंट ऑफ द इयर 3' लवकरच येणार भेटीला, चित्रपट नाही तर वेबसीरिजच्या माध्यमातून होणार रिलीज

Student Of The Year Part 3: करण जोहरनेच आलिया भट्ट (Alia Bhatt), वरुण धवन (Varun Dhawan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिली होती. या तिघांनीही 'स्टुडंट ऑफ द इअर' (Student Of The Year) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
Student Of The Year Part 3
Student Of The Year Part 3Saam Tv

Student of the year 3:

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध डायरेक्टर करण जोहर (Karan Johar) सध्या चर्चेत आला आहे. करण जोहरचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू करतात. करण जोहरनेच आलिया भट्ट (Alia Bhatt), वरुण धवन (Varun Dhawan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिली होती. या तिघांनीही 'स्टुडंट ऑफ द इअर' (Student Of The Year) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चांगली कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचा आता तिसरा पार्ट येण्याबाबतची माहिती समोर आली आहे.

'स्टुडंट ऑफ द इयर' नंतर करण जोहर 'स्टुडंट ऑफ द इयर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला होता. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे मुख्य भूमिकेत होते. करण जोहरने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चे दिग्दर्शन केले नसून त्याची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक पुनित मल्होत् हेरा ​​होते. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलची बातमी समोर येत आहे.

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सिनेस्टार इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना 'स्टुडंट ऑफ द इयर 3' चे अपडेट दिले आहे. या चित्रपटाला पुन्हा एकदा नवा दिग्दर्शक मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच 'स्टुडंट ऑफ द इयर 3' चित्रपट म्हणून नव्हे तर वेबसीरिज म्हणून प्रदर्शित करण्याचा प्लान असल्याचेही सांगण्यात आले आहे.

'स्टुडंट ऑफ द इयर 3' च्या कलाकारांबाबत अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. मात्र यासाठी शनाया कपूरचे नाव बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन 'नॉक्टरनल बर्गर' फेम रीमा माया करणार असल्याचे करण जोहरने सांगितले. तो म्हणाला की, 'रीमा माया स्टुडंट ऑफ द इयरच्या डिजिटल आवृत्तीचे दिग्दर्शन करणार आहेत. पण हा त्यांचा मार्ग असेल माझा नाही. जर मी रीमा मायेच्या जगात प्रवेश केला तर मी ते आणखी भ्रामक बनवीन, जे तिच्या नावाचा अर्थ आहे.'

Student Of The Year Part 3
Bade Miyan Chote Miyan: ...अन् टायगर श्रॉफने अक्षय कुमारला केलं एप्रिल फूल, VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

रीमा माया या स्वतंत्र चित्रपट निर्मात्या आहेत. त्या शॉर्ट फिल्म्स बनवण्यासाठी ओळखल्या जातात. अलीकडेच त्यांनी 'नॉक्टर्नल बर्गर' हा चित्रपट बनवला होता. ज्याचा प्रीमियर सनडान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये शॉर्ट फिल्म प्रोग्राम विभागात झाला. त्यांनी नेटफ्लिक्स, रेड बुल आणि बोट सारख्या ब्रँडसाठी व्हिडिओ देखील दिग्दर्शित केले आहेत. आता त्या 'स्टुडंट ऑफ द इयर 3'चे दिग्दर्शन करणार आहे.

Student Of The Year Part 3
Bollywood Movie Release April 2024 : एप्रिलमध्ये मनोरंजनाची खास मेजवानी; एक-दोन नव्हे तर 11 चित्रपट होणार प्रदर्शित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com