Bollywood Movie Release April 2024 : एप्रिलमध्ये मनोरंजनाची खास मेजवानी; एक-दोन नव्हे तर 11 चित्रपट होणार प्रदर्शित

Bollywood Movies: या महिन्यामध्ये एक-दोन नाही तर तब्बल 11 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही चित्रपट रोमँटिक, काही चित्रपट अॅक्शन तर काही चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित असणार आहे.
Bollywood Movie Release April 2024
Bollywood Movie Release April 2024 Saam Tv

Bollywood Movie Release In April List:

एप्रिल महिना हिंदी सिनेरसिकांसाठी खूपच खास ठरणार आहे. या महिन्यामध्ये एक-दोन नाही तर तब्बल 11 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही चित्रपट रोमँटिक, काही चित्रपट अॅक्शन तर काही चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित असणार आहे. या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार- टायगर श्रॉफ यांचा (Akshay Kumar And Tiger Shroff) 'छोटे मियां बडे मियां', परिणीती चोप्रा - दिलजीत दोसांझ यांचा (Parineeti Chopra And Diljit Dosanjh) 'अमरसिंग चमकिला', विजय देवरकोंडा- मृणाल ठाकूर (Vijay Devarakonda And Mrunal Thakur) यांचा 'फॅमिली स्टार', विद्या बालन- प्रतिक गांधी यांचा 'दो और दो प्यार' यांचा समावेश असणार आहे. हे सर्व चित्रपट कधी आणि कोणत्या तारखेला रिलीज होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत...

बडे मियाँ छोटे मियाँ -

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. अली अब्बास जफरचा हा चित्रपट ॲक्शनने परिपूर्ण असणार आहे. मानुषी छिल्लर आणि आलिया एफ देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 10 एप्रिलला म्हणजे ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

मैदान -

'शैतान'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर अजय देवगण लवकरच 'मैदान' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बोनी कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची कथा फुटबॉलच्या माध्यमातून भारताचे वैभव परत आणणाऱ्या सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असेल. हा चित्रपट 10 एप्रिलला रिलीज होणार आहे.

अमरसिंग चमकीला -

अमरसिंग चमकीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही तर OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पंजाबी गायक अमर सिंग चमकीला यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात परिणीती अमरजोतची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 12 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

लव्ह सेक्स और धोका २ -

दिबाकर बॅनर्जीचा LSD2 हा चित्रपट देखील या महिन्यातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'लव्ह सेक्स और धोका २' हा चित्रपट 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला पार्ट सुपरहिट ठरल्यामुळे चाहत्यांना दुसऱ्या पार्टकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

रुसलान -

'अंतिम' चित्रपटानंतर आता अभिनेता आयुष शर्मा पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून त्यात आयुष शर्मासोबत सुश्री मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करण एल बुटानी दिग्दर्शित या चित्रपटात जगपती बाबू देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

फॅमिली स्टार -

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्या 'फॅमिली स्टार' या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. परशुराम पेटला दिग्दर्शित या चित्रपटात विजय चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मिस्टर अँड मिसेस माही -

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाबद्दल आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे लिहिले होते की, 'दोन हृदय एकाच स्वप्नाचा पाठलाग करतील. ही अतिशय परिपूर्ण कथा आहे.'

अरनमनाई 4 -

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'अरनमनाई 4' हा देखील एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट येत्या 11 एप्रिल रोजी रिलीज होणा आहे.

दो और दो प्यार -

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ यांचा 'दो और दो प्यार' हा चित्रपटसुद्धा एप्रिलमध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मंकी मॅन -

बजरंग बालीच्या कथेपासून प्रेरणा घेऊन बनवलेला 'मंकी मॅन' हा चित्रपटही एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहेत. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी -

विनय वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला चित्रपट 'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी' (JNU: Jahangir National University) सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com