Bade Miyan Chote Miyan: ...अन् टायगर श्रॉफने अक्षय कुमारला केलं एप्रिल फूल, VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Tiger Shroff Pranks With Akshay Kumar: आपल्या को-स्टार्ससोबत प्रँक करण्यामध्ये बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमी पुढे असतो. पण यावेळी टायगर श्रॉफने (Tiger Shroff) अक्षय कुमारचा प्रँक केला आहे.
Akshay Kumar And Tiger Shroff
Akshay Kumar And Tiger Shroff Saam Tv

Akshay Kumar April Fool Video:

एप्रिल महिन्याला सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक जणांची मस्करी करत त्यांना एप्रिल फूल (April Fool) बनले जाते. फक्त सामान्य नागरिकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील एप्रिल फूल बनवण्यात मागे हटत नाहीत. अनेक सेलिब्रिटी आपल्या को-स्टार्सला एप्रिल फूल बनवतात. आपल्या को-स्टार्ससोबत प्रँक करण्यामध्ये बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमी पुढे असतो. पण यावेळी टायगर श्रॉफने (Tiger Shroff) अक्षय कुमारचा प्रँक केला आहे. टायगर श्रॉफने अक्षय कुमारला एप्रिल फूल बनवले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) मुळे चर्चेत आहे. अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन देखील करणार आहे. दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलेच व्यस्त आहेत. अशामध्ये त्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहे. एप्रिल फूलच्या संधीचा फायदा घेत टायगर श्रॉफने अक्षय कुमारला वेडं बनवण्याची संधी सोडली नाही.

टायगर श्रॉफने यावेळी संपूर्ण प्लानिंगने अक्षय कुमारचा एप्रिल फूल केला आहे. टायगर श्रॉफ काही जणांसोबत गेम खेळत आहे. त्याचवेळी अक्षय कुमार देखील त्यांच्यासोबत गेम खेळण्यासाठी येतो. पण गेम सुरू करण्यापूर्वी टायगर श्रॉफने कोकच्या बॉटलमध्ये काही तरी मिक्स करून ठेवले होते. त्यानंतर अक्षय कुमार जेव्हा गेम खेळण्यासाठी येतो. तेव्हा टायगर त्याला कोकची बॉटल देण्यास सांगतो. त्यानंतर तो ती बॉटल खोलून देण्यासाठी सांगतो. जेव्हा अक्षय कुमार बॉटल उघडतो तेव्हा त्याच्या तोंडावर संपूर्ण कोक येते. त्यानंतर अक्षय कुमारने हे कोक इतर सर्वांच्या अंगावर फेकून दिले. यावेळी टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारसोबत सर्वजण खूप हसू लागतात.

Akshay Kumar And Tiger Shroff
Kartik Aaryan: डॉन बनून धुमाकूळ घालण्यासाठी कार्तिक आर्यन सज्ज, विशाल भारद्वाज यांच्या थ्रिलर चित्रपटामध्ये एन्ट्री

टायगर श्रॉफने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा एप्रिल फूल व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'एप्रिल फूल बडे मियां' असे लिहिले आहे. टायगर श्रॉफच्या या व्हिडीओला दोन तासांमध्ये साडेसात लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. सध्या त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट येत्या १० एप्रिला प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar And Tiger Shroff
Vijay Deverakonda ने 25 लाख रुपयांमध्ये का केला पहिल्या फिल्म फेअर अवॉर्डचा लिलाव?, स्वत:च केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com