Kartik Aaryan: डॉन बनून धुमाकूळ घालण्यासाठी कार्तिक आर्यन सज्ज, विशाल भारद्वाज यांच्या थ्रिलर चित्रपटामध्ये एन्ट्री

Kartik Aaryan Play Don Hussain Ustara Role: कार्तिक आर्यनचे नाव आता विशाल भारद्वाज यांच्या हुसैन उस्तरा यांच्यावर आधारित चित्रपटासोबत जोडले जात आहे. या चित्रपटाबाबत एकामागून एक अपडेट्स समोर येत आहेत.
Kartik Aaryan
Kartik Aaryan Saam Tv

Kartik Aaryan And Vishal Bhardwaj Film:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या 'भूल भुलैया 3' (Bhool Bhoolaiya 3) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी देखील दिसत होती. आता या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनचे नाव आता विशाल भारद्वाज यांच्या हुसैन उस्तरा यांच्यावर आधारित चित्रपटासोबत जोडले जात आहे. या चित्रपटाबाबत एकामागून एक अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशामध्ये आता हुसैन उस्तरावर तयार होत असलेल्या चित्रपटाचे एक नवीन अपडेट समोर आले आहे.

कार्तिक आर्यनचे नाव एकामागून एका चित्रपटांशी जोडले जात आहे. कार्तिक आर्यन चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाजसोबत काम करणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. आता पत्रकार राहुल रावत यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कार्तिक आर्यन हा विशाल भारद्वाजच्या आगामी चित्रपटात डॉन हुसैन उस्तराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग याचवर्षी सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. विशाल भारद्वाज लवकरच या चित्रपटाची घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे.

कार्तिक आर्यन आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. सध्या यावर चर्चा सुरू आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाद्वारे केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तारा' असे असणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग ग्रीसव्यतिरिक्त इतर देशांमध्ये होणार आहे. सध्या या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधण्याचे काम सुरू आहे. या चित्रपटामध्ये कार्तिकची भूमिका ही भावनांसोबत अॅक्शनने भरलेली असणार आहे. हा चित्रपट 150 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विशाल भारद्वाज यांच्या या आगामी चित्रपटाशिवाय कार्तिक आर्यनकडे सध्या अनेक चांगले चित्रपट आहेत. 'भूल भुलैया 3' या चित्रपटात कार्तिक आर्यन तृप्ती दिमरीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त विद्या बालन, माधुरी दीक्षित या दोघी देखील दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कार्तिक आर्यन चित्रपट दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणार आहे.

Kartik Aaryan
Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील सध्या आहे कुठे?, नवीन VIDEO तील अदांनी चाहत्यांना लावलं वेड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com